डॉक्टरचा जडला मेव्हणीवर जीव, मग प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा ‘असा’ काढला काटा

मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधाला डॉक्टरच्या पत्नीने तीव्र विरोध सुरू ठेवला होता. त्यातूनच फारूख व त्याच्या पत्नीचा वारंवार वाद होत असायचा. यादरम्यान फारूखशी लग्न करण्यासाठी मेहुणीने तयारी दर्शवली होती.

डॉक्टरचा जडला मेव्हणीवर जीव, मग प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा 'असा' काढला काटा
अनैतिक संबंधाच्या वादातून पुतण्याने काकीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 5:31 PM

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेलीतील एका डॉक्टरच्या घरी घडलेल्या दरोडा आणि हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. डॉक्टरने अनैतिक संबंधासाठी पत्नीची हत्या करुन दरोड्याचा बनाव केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरचा मेहुणीवर जीव जडला होता, मात्र दोघांच्या या प्रेमसंबंधाला डॉक्टरच्या पत्नीचा विरोध होता. आपल्या मेहुणीसोबतच्या नात्यामध्ये पत्नीचा अडसर ठरू नये म्हणून डॉक्टरने तिचा खून केला आणि नंतर हे गुन्हेगारी कृत्य लपवण्यासाठी दरोड्याचा बनाव रचला. यासाठी त्याने आपल्या घरातील मौल्यवान ऐवज गायब करून दरोड्याची घटना घडल्याचे चित्र उभे करण्यासाठी घरातील सामान अस्तावस्त पसरवले होते. या धक्कादायक गुन्हेगारी कृत्याचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांना मोठा धक्का बसला असून, संपूर्ण बरेली परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरोडेखोरांनी आपल्यावरही हल्ला केल्याचा बनाव

आरोपी डॉक्टरने पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर दरोड्याचा बनाव करण्यासाठी त्याने स्वतःवर ब्लेड मारून हल्ला केला. फारुख आलम असे आरोपी डॉक्टरचे नाव असून पोलिसांनी त्याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. तसेच पुरावे नष्ट केल्याचाही गंभीर आरोप आहे. फारुखने स्वतःवरही प्राणघातक हल्ला झाल्याचे दाखवण्यासाठी अंगावर अनेक ठिकाणी ब्लेडने वार केले होते.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी डॉक्टरला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवले. त्यानंतर पुढील तपास सुरू केला होता. तपासानंतर पोलिसांनी या धक्कादायक तसेच फिल्मी स्टाईलने करण्यात आलेल्या हत्याकांडाचा उलगडा केला. पोलिसांनी डॉक्टरला अटक करतानाच घटनास्थळी पंचनामा करून डॉक्टरने लपवलेले दागिने, ब्लेड तसेच इंजेक्शन जप्त केले आहे.

हे सुद्धा वाचा

मेहुणी म्हणाली होती, बहिण जिवंत नसती तर लग्न केले असते!

आरोपी फारूखला त्याच्या मेहुणीनेच हत्याकांड करायला भाग पाडल्याचे उघड झाले आहे. मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधाला डॉक्टरच्या पत्नीने तीव्र विरोध सुरू ठेवला होता. त्यातूनच फारूख व त्याच्या पत्नीचा वारंवार वाद होत असायचा. यादरम्यान फारूखशी लग्न करण्यासाठी मेहुणीने तयारी दर्शवली होती. मात्र तिने माझी बहीण जिवंत नसती तर लग्न केले असते, असे म्हटले होते.

तिचे हे शब्द कानावर पडल्यापासून फारूख अस्वस्थ होता. काहीही करून पत्नीचा अडसर दूर करण्याचे प्लॅनिंग त्याने केले. त्यासाठी त्याने फिल्मी स्टाईल दरोड्याचा बनाव रचला. 13 फेब्रुवारीच्या रात्री दोन दरोडेखोर आपल्या घरी आले आणि त्यांनी आम्हा दोघांवर हल्ला केला. त्यात पत्नीचा मृत्यू झाला, असा दावा डॉक्टरने केला होता. मात्र फॉरेन्सिक टीम आणि एसओजीच्या अधिक तपासात फारुखचे पितळ उघडे पडले आणि हत्याकांडाचा उलगडा झाला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.