Crime: घरकाम करणाऱ्या महिलेला 20 व्या मजल्यावरुन खाली फेकले तरीही ‘ती’ जिवंत वाचली; मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईतील मालाड परिसरातील एका हाय प्रोफाईल इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मालाड पश्चिम येथील सुंदर नगर परिसरातील ब्ल्यू होरायझन इमारतीमध्ये ही महिला घरकाम करण्यासाठी येत होती. येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीने या महिलेला विसाव्या मजल्यावरून खाली ढकलून दिले .मात्र, ही महिला 18 व्या मजल्यावरील छतावर पडली. सोसायटीच्या लोकांनी या महिलेला पाहिले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने या महिलेचे प्राण वाचवले. सध्या तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Crime: घरकाम करणाऱ्या महिलेला 20 व्या मजल्यावरुन खाली फेकले तरीही 'ती' जिवंत वाचली; मुंबईतील धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 10:03 PM

मुंबई : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव मुंबईत घरकाम करणाऱ्या एका महिलेला आला आहे. मुंबईच्या(Mumbai) मालाड(Malad) परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीत ही महिला घरकाम करत होती. याच इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने या महिलेला मारहाण करत तिला उचलून विसाव्या मजल्यावरून खाली फेकले. मात्र या भयानक दुर्घटनेतून ही महिला आश्चर्यकारकरित्या जिवंत बचावली आहे. या घटनेमुळे इमारतीत एकच दहशत पसरली आहे. आरोपी सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

महिलेला 20 व्या मजल्यावरुन फेकल्यावर ती 18 व्या मजल्यावर अडकली

मुंबईतील मालाड परिसरातील एका हाय प्रोफाईल इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मालाड पश्चिम येथील सुंदर नगर परिसरातील ब्ल्यू होरायझन इमारतीमध्ये ही महिला घरकाम करण्यासाठी येत होती. येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीने या महिलेला विसाव्या मजल्यावरून खाली ढकलून दिले .मात्र, ही महिला 18 व्या मजल्यावरील छतावर पडली. सोसायटीच्या लोकांनी या महिलेला पाहिले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने या महिलेचे प्राण वाचवले. सध्या तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरक्षा रक्षकासह लिफ्टने 20 व्या मजल्यावर गेली

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ती ब्ल्यू होरायझन इमारतीमध्ये ही महिला कामासाठी गेली होती. तिथे ए आणि बी विंग मधले काम आटपले. पुन्हा एका कामासाठी त्या ए विंगमध्ये निघाली. तेव्हा बी विंगचा सुरक्षारक्षक असलेल्या सिंग ने त्यांना थांबवत ए विंगच्या विसाव्या मजल्यावर फ्लॅट 2001 मध्ये नवीन मॅडम रहायला आली आहे. त्यांच्या कडे घर काम करायचे आहे असे सांगितले. त्यानुसार ती त्याच्या सोबत लिफ्टने 20 व्या मजल्याच्या फ्लॅटकडे जाण्यासाठी निघाली.

महिलेला 20 व्या मजल्यावरुन फेकून सुरक्षा रक्षक फरार झाला

एका दिवसाचे काम आहे आणि ती त्यासाठी तुला तीन हजार रुपये देईल असे सिंगने महिलेला सांगितले. त्यावर ‘मला फिक्स काम हवे आहे’, असे उत्तर तिने दिल्यावर तू स्वतः बोलून घे असा सल्ला सिंग ने तिला दिला. विसाव्या मजल्यावर पोहोचताच सिंग याने मॅडमला फोन केला आणि त्यांना येण्यास अर्धा तास लागणार असुन गच्चीवर त्यांनी त्यांच्या लहान मुलाचे कपडे ठेवले आहेत जे महिलेला घेऊन जाण्यास सांगितल्याचे सिंगने महिलेला सांगितले. तेव्हा महिला गच्चीच्या दिशेने वळली असता सिंगने मागून तिचा गळा आवळत तिला खाली पाडले. त्यात तिच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर सिंगने थेट तिला उचलून विसाव्या मजल्याच्या गच्चीवरून खाली फेकून दिले आणि पसार झाला होता. त्यानंतर पोलिसनी शोध घेऊन आरोपीला अटक करण्यात आले आहे.

20 व्या मजल्यावरुन का फेकले

मालाड पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून चौकीदार अर्जुन सिंग याला अटक केली आहे. आरोपी वॉचमनने महिलेला का ढकलले, याचा खुलासा पोलिसांनी अद्याप केलेला नाही.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.