आर्थिक विवंचनेतून मायलेकात सतत वाद, अखेर दारुच्या नशेत मुलाने आईचाच केला घात

रवी पुमणी हा उच्चशिक्षित असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. त्याचा महिन्याचा सर्व पगार कर्जाचे हफ्ते फेडण्यात आणि घरभाडे भरण्यात जात होता. यामुळे आर्थिक चणचणीतून आई आणि मुलामध्ये नेहमी वाद व्हायचा.

आर्थिक विवंचनेतून मायलेकात सतत वाद, अखेर दारुच्या नशेत मुलाने आईचाच केला घात
दारुच्या नशेत मुलाने आईचाच केला घातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 4:38 PM

कल्याण : कल्याणमध्ये दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी पोलिसांना महिलेच्या मृत्यूबाबत उलगडा करण्यास यश आले आहे. महिलेने आत्महत्या (Suicide) केली नसून हत्या (Murder) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोटच्या मुलानेच घरगुती वादातून स्वतःच्या आईला संपवले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. रवी पुमणी असे आरोपी मुलाचे नाव आहे. तर सरोजा पुमणी असे मयत आईचे नाव आहे.

आर्थिक चणचणीतून मायलेकात रोज भांडणं व्हायची

रवी पुमणी हा उच्चशिक्षित असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. त्याचा महिन्याचा सर्व पगार कर्जाचे हफ्ते फेडण्यात आणि घरभाडे भरण्यात जात होता. यामुळे आर्थिक चणचणीतून आई आणि मुलामध्ये नेहमी वाद व्हायचा. तसेच रवीला दारुचेही व्यसन होते.

नेहमीप्रमाणे मायलेकात दोन दिवसापूर्वी वाद झाला. याच वादातून रवीने नायलॉनच्या दोरीने आईचा गळा आवळला. ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी मृतदेह पंख्याला लटकवला. यानंतर रवीने स्वतःलाही जखमा करुन घेतल्या.

हे सुद्धा वाचा

महिलेची मुलगी घरी आल्यानंतर सर्व प्रकार उघड

आईच्या हत्येनंतर रवीने बहिणीला फोन करुन आईचा आणि आपला वाद झाल्याचे सांगितले. बहीण घरी आली असता आई पंख्याला लटकलेली आढळली. तिने कोळसेवाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्याच घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच जखमी रवीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

शवविच्छेदन अहवालात हत्येचा खुलासा

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सरोजा यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. रवीला कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.