ती 27 वर्षे पोलीसांना गुंगारा देत होती, खून प्रकरणात मिळाली होती जन्मठेप, अखेर अशी सापडली
दिल्ली आणि आंध्रात तिला शोधण्यात आले पण ती सापडली नाही. काही लोक म्हणाले ती मुंबईत आहे, काहींना वाटले कोरोनात गेली. त्यामुळे कोरोना लसीचा डाटाही तपासला गेला. अखेर ती...

केरळ : केरळात एका महिलेची अशी कहानी समोर आली आहे की ती ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत झाल्यावाचून रहाणार नाहीत. एका खून प्रकरणात दोषी ठरलेली एक महिला तब्बल 27 वर्षांनी पोलीसांच्या तावडीत सापडली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर तिने आपल्या गुन्ह्याची कबूलीही दिली होती. तिला आजन्म कारावासाची सजा देखील सुनावली गेली. परंतू कोर्टाचा निकाल येताच ती दुसऱ्याच दिवसापासून पसार झाली. ती 27 वर्षे कुठे रहात होती, कशी जगत होती ही कहाणी रंजक आहे.
केरळच्या अलपुझा जिल्ह्यातील मनकमकुझी गावात रेजी नावाची एक तरुणी आपल्या मरियम्मा नावाच्या नातलगाकडे रेजी रहात होती. त्यांच्या घरकाम करायचे काम रेजी करीत होती. मरियम्मा या आपले पती कुझिपराम्बिल थेक्केथिल पप्पचन बरोबर रहात होत्या. त्यांची तिन्ही मुले त्यांच्या पासून दूर रहात होती. 21 फेब्रुवारी 1990 रोजी त्यांच्या घरी चोरी झाली. सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या घटनेत मरियम्मा यांचा मृत्यू झाला होता. रेजी हिला मरियम्माच्या पतीने कामावरुन काढल्याच्या दिवशीच हा चोरीचा प्रकार घडला होता. तपासात रेजीच्या घरीच दागिने सापडले आणि रेजी हत्येची कबूलीही दिली.
अतिरिक्त सत्र न्यायालयात हे प्रकरण येताच रेजीला संशयाचा फायदा देऊन दोषमुक्त करण्यात आले. परंतू सरकारी पक्षाने केरळ हायकोटार्त हे प्रकरण नेले. आणि रेजीला आजन्म कारावासाची शिक्षा झाली. जेव्हा तिला कळले की तिला शिक्षा झाली तेव्हाच ती पसार झाली. पोलिसांकडे तिच्या जुन्या फोटो आणि पत्त्यापलिकडे काहीच माहीती नव्हती.
27 वर्षांनंतर रेजीची मिनी झाली
या 27 वर्षांत रेजीने कोणत्याही नातेवाईकाशी संपर्क केला नाही, सोशल मिडीयापासून लांब राहीली, 1996 नंतर ती कोट्टयमला गेली तेथे तिने घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम सुरु केले. तिने तिचे नाव रेजी ऐवजी मिनी केले. 1999 मध्ये तिने एका बांधकाम कामगाराशी लग्न केले. त्यानंतर एर्नाकुलमच्या पल्लारीमंगलम गावात शिफ्ट झाली. तिला दोन मुले आहेत. एक सुरक्षा बलाचे प्रशिक्षण घेतोय तर दुसरा परदेशात अभ्यास करीत आहे. रेजी एका टेक्सटाईल दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करीत आहे.
सहा महिन्यांपूर्वी ट्रायल कोर्टाने रेजीला पकडण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर शोध सुरु झाला, जुने रेकॉर्ड शोधून पोलीस कोट्टयमला पोहचले. पोलीस अखेर ती काम करीत असलेल्या दुकानात पोहचले. तेथे रेजी नावाने हाक मारताच ती चपापली, परंतू तिने कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. त्यानंतर तिला अटक होऊन तिरुवनंतपुरमच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. पप्पाचन याचे सात वर्षांपूर्वी 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा मोठा मुलगा केई योहान्नन याने म्हटले की रेजी त्यांची दूरची नातेवाईक आहे. परंतू तिला आईने कामावरुन का काढले याचे कारण त्याला माहीती नाही.