दारुच्या दुकानात मालक आणि ग्राहक यांच्यात भांडण, मालकाने ग्राहकाच्या डोक्यात फोडली बियरची बॉटल, मग…
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वाईन शॉप चालकावरती काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ज्या इसमाला मालकाने मारहाण केली, त्यांच्या डोक्यातून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
निलेश डाहाट, चंद्रपूर : शहरातील (Chadrapur city) आनंदवाईन शॉपमध्ये (Anand Wine Shop) ग्राहकावर जीव घेणा हल्ला झाला, ग्राहकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. शहरात दारूबंदी उठल्यानंतर चर्चेत असलेल्या आनंद वाईन शॉपच्या मालकाने एका ग्राहकाच्या डोक्यावर बियरची बाटली फोडल्याची खळबळजनक घटना घडली असून रामनगर पोलीस ठाण्यात (Ram Nagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप लक्ष्मण नरवाडे रा.जलनगर वार्ड, चंद्रपूर असे गंभीर जखमी पीडिताचे नाव असून तो रेल्वेमध्ये माथाडी कामगार आहे.
ग्राहकाची प्रकृती चिंताजनक
जलनगर वार्डातील दिलीप नरवाडे आपले काम आटोपून आनंद वाईन शॉप येथे दारू खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी कसल्याही प्रकारची वादावादी नसताना नरवाडे यांना मारहाण करण्यात आली. दुसऱ्याचा राग नरवाडे यांच्यावर काढला आहे. वाईन शॉप मालक संदीप अडवाणी याने दिलीपच्या डोक्यावर जोरात बियरची बाटली मारली त्यामध्ये दिलीप गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला व तो खाली कोसळला. तेव्हा आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी व जलनगर वासीयांनी त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
बियर चालकावरती काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वाईन शॉप चालकावरती काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ज्या इसमाला मालकाने मारहाण केली, त्यांच्या डोक्यातून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. नेमकं भांडण कशामुळं झालं, त्याचबरोबर मारहाण का करण्यात आली याची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे.