नंबर एक रिक्षा अनेक, बोगस रिक्षाचं प्रकरण उजेडात
यापुर्वी सुध्दा अशा प्रकारची अनेक प्रकरण मुंबई पोलिसांनी उजेडात आणली आहेत. ठाणे, कल्याण, डोबिंवली, विरार, वसई या भागात अशा पद्धतीने एकाचं नंबरच्या अनेक रिक्षा सुरु असल्याची अनेक प्रकरणं उजेडात आली आहेत.
नालासोपारा : मुंबईतील नालासोपारा (Nalasopara) भागात एक नवं प्रकरण उजेडात आलं आहे. यापुर्वी सुध्दा अशा पद्धतीची अनेक प्रकरण उजेडात आली होती. नालासोपारा वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचं त्यामुळे सगळीकडं कौतुक होतं आहे. एकाच नंबरच्या दोन रिक्षा (rickshaw) फिरत असल्याचे वाहतूक पोलीस राजू गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सविस्तर चौकशी केली आहे. संबंधित रिक्षाा चालकाला ताब्यात घेतला आहे. कामलेशकुमार सुदामा साव असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस रिक्षा चालकाचे (bugus rickshaw) नाव आहे. त्याच्यावर आचोळा पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामुळे इतर रिक्षा चालक सुध्दा चांगलेचं घाबरले आहेत.
नंबर एक रिक्षा अनेक
नालासोपाऱ्यात बोगस रिक्षांचा सुळसुळाट झाला आहे. वाहतूक पोलिसांच्या तपासणीत एकाच नंबर प्लेटच्या दोन रिक्षा आढळून आल्या आहेत. त्यापैकी एका बोगस रिक्षा चालकांवर आचोळा पोलीस ठाण्यात भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करून रिक्षा जप्त केल्या आहेत. कामलेशकुमार सुदामा साव असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस रिक्षा चालकाचे नाव आहे. नालासोपारा पूर्व अल्कापुरी कॅपिटल मॉल जवळ वाहतूक पोलीस राजू गायकवाड कर्तव्य बजावत या असताना MH 48 AX 5651 या नंबरचा दोन रिक्षा आढळून आल्या.
प्रकरण मुंबई पोलिसांनी उजेडात आणली
यापुर्वी सुध्दा अशा प्रकारची अनेक प्रकरण मुंबई पोलिसांनी उजेडात आणली आहेत. ठाणे, कल्याण, डोबिंवली, विरार, वसई या भागात अशा पद्धतीने एकाचं नंबरच्या अनेक रिक्षा सुरु असल्याची अनेक प्रकरणं उजेडात आली आहेत. अजून काही प्रकरण उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.