नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला, पण ‘ते’ अडथळा ठरत होते, मग तो संतापला अन्…

त्याने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला. मात्र कंपनीच्या सीईओ आणि एमडीला हे रुचलं नाही. त्यामुळे ते त्याच्या व्यवसायात अडथळा निर्माण करत होते. यातून पुढे जे घडलं ते भयंकर.

नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला, पण 'ते' अडथळा ठरत होते, मग तो संतापला अन्...
व्यावसायिक वादातून माजी कर्मचाऱ्याने सीईओ आणि एमडीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 10:37 AM

बंगळुरु : व्यवसायात अडथळा निर्माण करत होते म्हणून माजी कर्मचाऱ्याने टेक फर्मच्या सीईओ आणि एमडीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरुत उघडकीस आली आहे. तलवार घेऊन तेट त्यांच्या केबिनमध्ये घुसून कर्मचाऱ्याने त्यांची हत्या केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. एमडी फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ विणू कुमार अशी मयतांची नावे आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. केबिनमधील आरडाओरडा ऐकून कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत पुढील तपास सुरु केला आहे.

…म्हणून त्याने थेट त्यांना संपवले

फेलिक्स आरोपीचे नाव असून, तो एरोनिक्स टेक फार्म कंपनीत नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र कंपनीचे सीईओ आणि एमडी त्याच्या व्यवसायात अडथळा निर्माण करत होते. यामुळेच फेलिक्स त्यांच्यावर संतापला होता. याच रागातून त्याने कंपनीत घुसून तलावारीने वार करत त्यांची हत्या केली. जीव वाचवण्यासाठी दोघांनीही पळण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरु

फेलिक्सला कंपनीत तलवार घेऊन पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये एकच कल्लोळ माजला. काही क्षणात केबिनमधून ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने कर्मचारी घाबरले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपी आधीच फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फेलिक्स टिक टॉक आणि रील्स बनवण्यासाठी फेमस होता.

हे सुद्धा वाचा

या घटनेनंतर शहरात एकच खळबळ माजली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.