नाशिक : कोणत्याही बापाच्या वाट्याला असं दु:ख वाट्याला यायला नको अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना ( Nashik Crime ) नाशिकमध्ये घडली आहे. 14 महिन्यांची लेक आपल्या बापाला भेटण्यासाठी दरवाजातून रस्त्यावर धावत येत होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने बापाच्या ( Father ) डोळ्यादेखत चिमूकलीचा मृत्यू ( Child Death ) झाला आहे. नाशिकच्या अंबड परिसरात ही घटना घडली असून पोलीसांनी ( Ambad Police ) चारचाकी वाहन चालवणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले आहे. पत्नीच्या उपचारासाठी आलेल्या पतीने आपल्या लेकीवर काळाने झडप घातल्याची घटना पाहिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमजद अखतारखान खान हे आपल्या पत्नीच्या उपचारासाठी नाशिकमधील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आले होते. पत्नी आणि 14 महिन्यांची मुलगी नातेवाईकांच्या घरी होती.
पंधरा दिवसांपासू नाशिक शहरातील एका खाजगी कंपनीत ते कामही करत होते. पत्नीच्या उपचारासाठी लागणारा पैसा जमा करण्यासाठी त्यांनी नाशिकमध्ये काम सुरू केले होते.
सायंकाळच्या वेळी कामावरून घरी परतत असतांना रस्त्यावर आपले वडील दिसताच आयेजाला मोठा आनंद झाला होता, त्यामध्ये आयेजा हिने वडिलांच्या दिशेने धावायला सुरुवात केली.
आयेजा रस्त्यावर असलेल्या वडिलांच्या दिशेने पळत असतांना भरधाव येणाऱ्या एका चारचाकीच्या चाकाखाली आयेजा आली, काही क्षणातच होत्याचे नव्हतं झालं असे दृश्य आयेजाचे झाले.
आयेजाचा चाक गेल्याने काही सेकंदात रक्ताचे थारोळे झाले, वडिलांनी आपल्या डोळ्यादेखत हे पहिल्याने वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला, काळजाचा तुकडा काही क्षणात निघून गेल्याची सल वडिलांच्या मनात निर्माण झाली.
आजूबाजूला असलेले नागरिक जमले, आयेजाला दवाखान्यात घेऊन जाण्याचीही स्थिती राहिली नव्हती, त्यामुळे आयेजाच्या आईवडिलांसह नातेवाईकांना अश्रु ढाळण्यापलीकडे हाती काहीही शिल्लक राहिले नव्हते.
अमजद अखतारखान खान हे मूळचे उत्तरप्रदेश मधील आहे. सध्या ते अंबडच्या विराट नगरमध्ये राहत होते, काळीज पिळवटून टाकणारी घटना समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यामधील धक्कादायक बाब म्हणजे घराशेजारी राहणाऱ्या हसनेन खान यांच्याच गाडीच्या आली आयेजा सापडली होती, ही बाब त्यांच्याही लक्षात न आल्याने ते निघून गेले होते. त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.