Accident CCTV : Alto मधून चिमुकली उतरली आणि 7 सेकंदात घडली काळजाचा ठोका चुकवणारी घटना
चिमुकली अगदी थोडक्यात मोठ्या अपघातातून बचावली! थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
राजस्थान : कार अपघाताचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद झाला. या अपघातातून 4 वर्षांची एक मुलगी आश्चर्यकारकरीत्या बचावली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अल्टो कारमध्ये चार वर्षांची ही मुलगी खेळत होती. ती या कारमधून उतरली आणि इतक्यात रस्त्यावरुन समोरच्या बाजूने येणारी भरधाव कार पार्क केलेल्या अल्टो कारवर जोरात आदळली आणि या कारवरच उलटली. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात राजस्थानच्या राजसमंद इथं घडला.
या थराक अपघाताचं 1.25 सेकंदांचं सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झालं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमधील दृष्यांमधून हा अपघात किती भयंकर होता, याची कल्पना करता येऊ शकते. दुपारच्या सुमारास हा अपघात घडला.
पाहा व्हिडीओ :
काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीची प्रचिती या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पाहून येऊ शकेल. चार वर्षांची मुलगी रसत्याच्या कडेला उभ्या केलेल्या अल्टो कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर स्वतःच जाऊन बसली होती. पण नंतर मिनिट भराच्या आतच ती काहीतरी जाणवतं आणि ती गाडीच्या खाली उतरले.
खाली उतरल्यानंतही ती काही सेकंद गाडी शेजारीच उभी असते, पण नंतर ती पुढे सरकते. इतक्यात सात सेकंदाच्या हात काळजाचा थराकाप उडवणारी घटना घडली. समोरच्या दिशेने येणारी भरधाव कार या अल्टोची जोरात धडक देते. ही धडक इतकी भीषण अपसते की, जागेवर ही कार पलटी होते.
पाहा संपूर्ण सीसीटीव्ही अनकट : Video
A four-year-old girl was playing in a car in Rajasthan. Just 7 seconds after he landed, a speeding vehicle hit the car. The CCTV video of the entire incident has come to the fore.
#Rajasthan #ACCIDENT #Viral #ViralVideos #India pic.twitter.com/1CloPpmzK6
— Siraj Noorani (@sirajnoorani) December 1, 2022
या अपघातमध्ये 4 वर्षांची चिमुकली दैव बलवत्तर म्हणून अगदी थोडक्यात बचावली. मात्र या अपघातात दोन्ही कारचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. सुदैवानं ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्हा या रस्त्याच्या आजूबाजूला आणि कारच्या जवळ इतर कुणीही नव्हतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. भरधाव वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जाते आहे.