भावी पत्नीशी बोलायचा म्हणून त्याला संताप अनावर झाला, मग फिरण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला अन्…

दोघे मित्र एकाच गावात राहत होते, एकाच कारखान्यात काम करत होते. मात्र एक चूक तरुणाला महागात पडली. ही चूक तरुणाच्या जीवावर बेतली.

भावी पत्नीशी बोलायचा म्हणून त्याला संताप अनावर झाला, मग फिरण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला अन्...
प्रेमप्रकरणातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 10:42 PM

जयपूर : आपल्या भावी पत्नीशी फोनवर बोलायचा म्हणून मित्रानेच मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी जयपूरच्या ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जखमी तरुणावर एसएमएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिलक सिंह असे जखमी तरुणाचे नाव आहे. आरोपी आणि पीडित तरुण दोघेही एकाच कारखान्यात काम करत होते. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित तरुणाच्या वडिलांचे निधन झाले आहे. यामुळे घरातील मोठा मुलगा म्हणून तिलक सिंहवर कुटुंबीयांची जबाबदारी आहे. त्याच्यासोबत जे घडले त्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आरोपी आणि पीडित दोघेही एकमेकांचे मित्र

आरोपी छोटे सिंह आणि पीडित तिलक सिंह दोघेही यूपीतील पचाक गावातील रहिवासी असून, दोघेही जयपूरमच्या ब्रम्हपुरीतील एकाच कारखान्यात काम करत होते. छोटे सिंहचा साखरपुडा झाला आहे. दोघेही मित्र दिवाळीनिमित्त आपल्या गावी आले होते तेव्हा छोटे सिंह आपल्या भावी पत्नीला भेटायला गेला होता. यावेळी तो आपला तिलकलाही सोबत घेऊन गेला होता. त्यावेळी तिलकची आणि छोटेच्या भावी पत्नीची ओळख झाली.

भावी पत्नीचे मित्राशी बोलणे खटकले

यानंतर तिलक आणि छोटूची भावी पत्नी दोघेही एकमेकांसोबत फोनवर बोलू लागले. जेव्हा छोटेला ही बाब समजली तेव्हा दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर छोटेने तिलकला जीवे मारण्याची धमकीही दिली. याच रागातून 16 एप्रिल रोजी छोटे तिलकला फिरण्याच्या बहाण्याने नाहरगढला घेऊन गेला. तेथे त्याला भरपूर दारु पाजली आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यानंतर छोटे तेथून पळून गेला. जखमी अवस्थेत तिलकला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.