दोघांचा एकीवरच जीव जडला, मग त्याला मैत्रीचाही विसर पडला अन्…

दोघा मित्रांचा एकाच मुलीवर जीव जडला होता. यातून मित्रांमध्ये द्वेष भावना निर्माण झाली होती. एका मित्राने दुसऱ्या मित्राचा काटा काढल्याचा कट रचला.

दोघांचा एकीवरच जीव जडला, मग त्याला मैत्रीचाही विसर पडला अन्...
प्रेमप्रकरणातून मित्रानेच मित्राला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 1:45 PM

पूर्णिया : दोघा मित्रांचा एकाच मुलीवर जीव जडला होता. यामुळे एकाने दुसऱ्याला आपल्या मार्गातून दूर करण्याचा कट रचला आणि तो यशस्वीही केला. पण कायद्यापुढे कुणी मोठा नसतो म्हणतात ना, तसेच झाले आणि अखेर पोलिसांनी आरोपींना अटक केली. पूर्णियातील बहुचर्चित मोहित रंजन हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. मोहित रंजनची त्याच्याच मित्राने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने हत्या केली. आरोपींकडून हत्येत वापरलेल्या लाठ्या-काठ्याही हस्तगत करण्यात आल्या आहेत. लव ट्रायंगलमधून मोहितची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मोहितचा मित्र पियुषसह त्याच्या साथीदारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

लव ट्रायंगलमधून मित्राने केली मित्राची हत्या

मोहित एक मेडिकल स्टोअर्स चालवत होता. मोहित आणि पियुष दोघे मित्र असून, दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम जडले होते. यावरुन पियुषचा मोहितवर राग होता. यामुळे मोहितला आपल्या प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी पियुषने त्याच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार पियुषने 14 एप्रिल रोजी रात्री मोहितला कॉल करुन पार्टीच्या बहाण्याने बोलावले. तेथे मोहित आणि पियुषमध्ये वादावादी झाली. यानंतर पियुष आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मोहितला मारहाण करत त्याची हत्या केली.

पोलिसांकडून आरोपींना अटक

मोहितची हत्या केल्यानंतर आरोपींनी आत्महत्या भासवण्यासाठी त्याचा मृतदेह सौरा नदीत फेकला. तसेच त्याची बाईक आणि बॅग नदीकिनारी फेकली. यानंतर 16 एप्रिल रोजी बेलोरीजवळ सौरा नदीत मोहितचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. त्याच दिवशी पोलिसांनी कसून तपास करत एका आरोपीला अटक केली. यानंतर पियुष, आलोक, कौशल आणि अमर कुमार सिंह यांना अटक केली.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.