मित्राचा वाढदिवस दणक्यात साजरा केला, मग काटा काढला; कारण काय?

तरुणाचा वाढदिवस होता. त्याने मित्रांसाठी वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. एका मित्राने पार्टीत नाचण्यासाठी डीजे आयोजित केला होता. पार्टीत सर्वांनी एन्जॉय केलं. मग पार्टी संपताच जे घडलं ते भयंकर होतं.

मित्राचा वाढदिवस दणक्यात साजरा केला, मग काटा काढला; कारण काय?
वाढदिवसाच्या पार्टीत डीजेवरुन झालेल्या वादातून मित्राची हत्याImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 5:21 PM

मुंबई : गोवंडी परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच मित्रांनी तरुणाची हत्या केल्याची घटना गोवंडीतील शिवाजी नगर भागात बुधवारी रात्री घडली. साबीर अन्सारी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक केली आहे, तर दोघे फरार आहेत. एक आरोपी अल्पवयीन आहे. साबिरच्या वाढदिवशी त्याच्या मित्रांनी डीजेचे आयोजन केले होते. पार्टी संपल्यानंतर त्यांनी साबिरला डीजेचे पैसे देण्यास सांगितले. मात्र साबिरने नकार दिल्याने मित्रांनी त्याची हत्या केली. याबाबत साबिरचे वडील युसूफ अन्सारी यांनी पोलिसात फिर्याद नोंद केली.

डीजेचे पैसे देण्यास नकार दिल्याने हत्या

साबीरने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी किमान 10,000 रुपये खर्च केले. यावेळी त्याच्या एका मित्राने पार्टीसाठी डीजेची व्यवस्था केली होती. पार्टी संपल्यानंतर मित्राने साबिरला डीजेचे पैसे देण्यास सांगितले. मात्र साबिरकडचे सर्व पैसे पार्टीत संपल्याने त्याने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे साबीरचे मित्र चिडले आणि भांडण सुरू झाले. यानंतर भांडण वाढत गेले आणि साबिरला धक्काबुक्की, लाथ मारण्यात आली. संशयितांपैकी सलामत याने शाहरुख या दुसऱ्या संशयिताकडून चाकू काढून साबीरच्या छातीत वार केला.

हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने साबिरचा मृत्यू

साबीरवर हल्ला करण्यासाठी शाहरुखने इतरांना प्रवृत्त केल्याचा अहवाल देत, साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार तो घटनास्थळावरून पळून गेला. साबीर रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. एका वाटसरूने त्याला ओळखले आणि त्याच्या वडिलांना ताबडतोब माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांना कळवले. साबिरला तात्काळ शताब्दी म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तत्पूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

एका आरोपीला अटक, दोघे जण फरार

चार संशयितांपैकी एक अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेतले, तर एकाला अटक करण्यात आली. अन्य दोघे अद्याप फरार आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता आरोपी अहमदाबाद, गुजरात येथे पळून गेले आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे (युनिट-6) एक पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 109 (प्रवृत्त करणे), 302 (हत्या), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.