उधारीच्या पैशाचा वाद उफाळला, मित्रानेच मित्राला आयुष्यातून उठवला

राजेश्वर पांडे आणि विपिन दुबे हे गेल्या पाच वर्षापासून एकमेकांचे मित्र होते. काही दिवसांपूर्वी राजेश्वरने विपुलला काही पैसे उसने दिले होते. मात्र हे पैसे विपिन परत करत नव्हता.

उधारीच्या पैशाचा वाद उफाळला, मित्रानेच मित्राला आयुष्यातून उठवला
कल्याणमध्ये मित्राकडून मित्राची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 8:05 PM

सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : उसने घेतलेले पैसे परत देत नसल्याने मित्रानेच मित्राची हत्या (Friend Murder Friend) केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये कोळसेवाडीच्या (Kalyan Kolsewadi) भागातील तिसगांव परिसरामध्येउघडकीस आली आहे. विपिन दुबे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस पोलीस ठाण्यात हत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (Police Arrested Accuse) केली आहे. राजेश्वर पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

राजेश्वरने विपिला उसने पैसे दिले होते

राजेश्वर पांडे आणि विपिन दुबे हे गेल्या पाच वर्षापासून एकमेकांचे मित्र होते. काही दिवसांपूर्वी राजेश्वरने विपुलला काही पैसे उसने दिले होते. मात्र हे पैसे विपिन परत करत नव्हता. राजेश्वरने पैशासाठी वारंवार विपिनकडे तगादा लावला होता. मात्र तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता.

पैसे परत मागितल्यास उडवाउडवीची उत्तरे द्यायचा

राजेश्वरने पैशाची मागणी केली असता नेहमी विपिन उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. याच कारणातून राजेश्वरने विपिनच्या हत्येचा कट रचला.

हे सुद्धा वाचा

घरी पार्टीसाठी बोलावून मित्राची हत्या केली

राजेश्वरने विपिनला आपल्या घरी पार्टी असल्याचे सांगत घरी येण्यास सांगितले. विपिन घरी आल्यानंतर दोघांनी मटण आणि दारुची पार्टी केली. त्यानंतर राजेश्वरने विपिनकडे आपल्या पैशाची मागणी केली.

हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलिसांना माहिती दिली

विपिनने पैसे देत नसल्याचे सांगतल्याने संतापलेल्या राजेश्वरने त्याला संपवले. यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फोन करुन पोलिसांना आपण मित्राची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख करत आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.