सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून संबंध बनवायची, नंतर तक्रार करुन पैसे लुटायची, गुजरातपासून गोव्यापर्यंत…
गोवा पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका महिलेला त्यांनी ताब्यात घेतलं आहे, त्या महिलेने आतापर्यंत अनेक राज्यात लोकांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन महिला आणि तीन लोकांना अटक केली आहे.
गोवा : गोवा पोलिसांनी (GOA POLICE) दोन महिला आणि तीन पुरुषांना अटक केली आहे. हे पाचजण मिळून मोठ्या कंपन्यातील लोकांना फसवायचा धंदा करीत असल्याचं उघडकीस आलं आहे. या पाचजणांनी आतापर्यंत मोठ्या उद्योजकांना आणि मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांना फसवले असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेष म्हणजे सौंदर्याच्या जाळ्यात ओढून संबंध तयार करायच्या, त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करीत होत्या. तक्रार मागे घेण्यासाठी त्या लोकांकडून (CRIME NEWS IN MARATHI) लाखो रुपये घेतले असल्याची माहिती पोलिसांनी (GUJRAT MAHARASHTRA) सांगितली आहे. गुजरातच्या लोकांना त्या महिलांनी अधिक फसवलं आहे.
गोवा पोलिसांनी यांची उलट तपासणी केली
ज्यावेळी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यावेळी त्यांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती सांगितली आहे. गोवा पोलिसांनी सांगितलं की, गुजरातचे एक व्यापारी किरण पटेल यांनी या संबंधात तिथल्या एका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ज्यावेळी गोवा पोलिसांनी यांची उलट तपासणी केली. त्यावेळी त्यांना समजलं की, या व्यक्तीच्या नावाने आणि महिलांच्या नावाने अनेक तक्रारी नोंद केल्या आहेत.
महिलांनी अनेक पुरुषांना लुटलं
या महिलांनी गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील महिलांनी अनेक पुरुषांना लुटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेकांच्या नावाने तक्रारी सुध्दा दाखल केल्या आहेत. ज्यावेळी त्या महिलांची चौकशी केली, त्यावेळी त्यांनी सोबत असलेल्या अनेकांची नावं सुध्दा सांगितली आहेत.
5 स्टार हॉटेलमध्ये अनेकांच्या भेटी
हा सगळा कारभार या पाच जणांनी बिझनेस मिटिंगच्या नावाखाली सुरु केला होता. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात त्यांनी 5 स्टार हॉटेलमध्ये अनेकांच्या भेटी घेतल्या आहेत. ते स्वत:चं तिथं एक हॉटेलची रुम बुक करीत होते. त्यानंतर त्यांना सांगायचे की दुसरी रुम खाली नाही. एकाचं रुममध्ये थांबल्यानंतर ती महिला त्या व्यापाऱ्याशी शारिरीक संबंध ठेवायची. ज्यावेळी तो व्यापारी तिथून निघून जायचा त्यावेळी महिला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायची.
स्वत: तक्रार दाखल करायची
पीडित महिला एफआयआर नोंदवण्यासाठी पुराव्यासह पोलिस ठाण्यात येत होत्या. त्या पुरुषांची काही कपडे सुध्दा पुरावा म्हणून घेऊन यायच्या.य पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला या गोष्टीवर त्या विश्वास ठेवायला त्याग पाडत होत्या. त्यामुळे अनेक तक्रारी दाखल होत होत्या. त्यानंतर त्या आरोपीकडून मोठी रक्कम उकळत होत्या.