Pandharpur Bike Theft : सात जिल्ह्यातील विविध कंपनीच्या बाईक चोरणाऱ्या टोळीला अटक, आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

आरोपींची कसून चौकशी केली असता त्याने आपण साथीदाराच्या मदतीने पंढरपूर शहर व परिसर तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची माहिती दिली.

Pandharpur Bike Theft : सात जिल्ह्यातील विविध कंपनीच्या बाईक चोरणाऱ्या टोळीला अटक, आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
सात जिल्ह्यातील विविध कंपनीच्या बाईक चोरणाऱ्या टोळीला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 8:20 PM

पंढरपूर : सोलापूर, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर अशा सात जिल्ह्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या 64 मोटरसायकली (Bikes) चोरणाऱ्या टोळीच्या पंढरपूर शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मोटारसायकल चोरणाऱ्या आठ आरोपींना अटक (Arrest) केली आहे. सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody)त रवानगी करण्यात आली आहे. चोरी केलेल्या दुचाकींची किंमत 21 लाख 30 हजार रुपये असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत असून, आरोपींनी आतापर्यंत किती बाईक चोरल्या आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केले

पंढरपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जात आहेत. याबाबत तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी तीन पथकांची नियुक्ती केली होती. या पथकास टाकळी येथे चोरीची मोटर सायकल विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर परिसरात सापळा रचून आरोपीस अटक केली आहे. यावेळी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपण साथीदाराच्या मदतीने पंढरपूर शहर व परिसर तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची माहिती दिली. याप्रकरणी विशाल सिंह, राजपूत प्रशांत भोसले, आकाश खिलारे, वैभव लवटे, लखन पडळकर, संकेत शिंदे, दीपक हाके आणि प्रदीप शेळके या आठ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली. (A gang who stole bikes from various companies in seven districts was arrested)

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.