मित्रासोबत फिरायला जाणे तरुणीला महागात पडले, दोन जण आले अन्…

तरुणी मित्रासोबत डोंगरावर फिरायला गेली होती. दोघे एकांतात बसून गप्पा मारत होते. यावेळी तिथे दोन आरोपी आले आणि त्यांना ब्लॅकमेल करु लागले. यानंतर जे घडले ते धक्कादायक होते.

मित्रासोबत फिरायला जाणे तरुणीला महागात पडले, दोन जण आले अन्...
विरारमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 10:38 AM

विरार / विजय गायकवाड : मित्रासोबत डोंगरावर फिरायला गेलेल्या तरुणीसोबत धक्कादायक कृत्य घडल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर अवघ्या दोन तासात विरार पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. धीरज राजेश सोनी आणि यश लक्षण शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही विरार पूर्व साईनाथ नगर येथील रहिवासी आहेत. आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विरार पूर्व साईनाथ परिसरातील पाच पायरीच्या डोंगरावरील जंगलात बुधवारी दुपारी ही घटना घडली.

पीडित तरुणी मित्रासोबत फिरायल गेली होती

पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत साईनाथ परिसरातील पाच पायरीच्या डोंगरावर फिरायला गेली होती. दोघांना एकांतात बसलेले पाहून आरोपींनी आधी त्यांचे फोटो काढले. मग त्यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. बदनामी होऊ नये म्हणून तरुणीच्या मित्राने फोन पे वरुन आरोपींना 500 रुपये दिले.

आधी पैसे मागितले मग तरुणीवर अत्याचार

पैसे दिल्यानंतर आरोपींनी तरुणीसोबत गैरवर्तन सुरु केले. तिच्या मित्राने प्रतिकार करत एका आरोपीच्या डोक्यात बियरची बाटली घातली. यानंतर संतापलेल्या आरोपींनी तरुणी आणि तिच्या मित्राचा मोबाईल हिसकावून घेतले. त्यांच्याकडची बॅगही जाळून टाकली आणि तरुणीच्या मित्राला मारहाण करत नग्न करून, हातपाय बांधले. मग तरुणीला बाजूच्या निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

हे सुद्धा वाचा

दक्ष नागरिकाने पोलिसांना दिली माहिती

तरुणाने कसेबसे हातपाय सोडवत तेथून जाणाऱ्या नागरिकांकडे मदतीची याचना केली. यानंतर एक दक्ष नागरिकाने गस्तीवरील विरार पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तरुणाची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी जंगल आणि इतर परिसरात तरुणीचा शोध घेतला. मात्र तरुणी तिच्या घरी असल्याचे समजले. पीडित तरुणीची चौकशी केली असता तिने दिलेल्या माहितीनंतर विरार पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

‘असे’ जेरबंद केले आरोपींना

मात्र आरोपींना पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. आरोपी जखमी झाला असल्याने तो जवळच्या रुग्णालयात गेला असावा म्हणून, त्याचे वर्णन आणि वय याची माहिती रुग्णालयात देण्यात आली. एका रुग्णालयात तो उपचारासाठी आला असल्याचे निष्पन्न झाले. लगेच संबंधित डॉक्टरकडून त्याचा फोटो मागविला, तो तरुणीला दाखविला असता तोच असल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत दुसऱ्या आरोपीलाही पकडले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.