Crime : मुलीच्या बेडरूमधून येत होता आवाज, आई उठली नसती तर ती आज जिवंत असती, थरारक घटनेने सगळेच हादरले
एका धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या अडीच वाजता मुलीची आई उठली आणि बेडरूमकडे गेली. त्यानंतर जे घडलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. जर आई उठलीच नसती तर कदाचित ती जिवंत असती, रात्री अडीच वाजता नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
मोबाईल म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. सकाळी उठल्यावर प्रत्येकजण आता हातात ब्रशऐवजी फोन घेतल्याचं पाहायला मिळतं. एखाद्या व्यसनापेक्षा जास्त माणसाला मोबाईलची सवय लागली आहे. मोबाईलचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण मोबाईलशिवाय राहू शकत नाही. मात्र या मोबाईलमुळे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने टोकाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रात्रीचे अडीच वाजले असताना मुलीच्या बेडरूनमधून बोलण्याचा आवाज येऊ लागला. नेमका हा आवाज कसला आहे हे पाहण्यासाठी मुलीची आई तिच्या बेडरूमकडे गेली. तर मुलगी फोनवर रात्री अडीच वाजता कोणासोबत तरी बोलत असल्याचं समजलं. आपली मुलगी इतक्या रात्री कोणाससोबत फोनवर बोलत आहे हे पाहून आईचा राग अनावर झाला. आई आतमध्ये गेली आणि मुलीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. मात्र त्यावेळी मुली आणि आईच्यात खटके उडाले.
आईने मुलीकडील मोबाईल हिसकावून घेतला आणि स्वत:जवळ ठेवला. आई तिच्या बेडरूममधून निघून गेली, मात्र मुलीला प्रचंड राग आला होता. आईने आपला मोबाईल घेतल्याने ती संतापली होती. तिने रागातच आपल्या रूमचा दरवाजा आतमधून बंद केला. काही वेळाने आई परत एकदा मुलीच्या रूमकडे गेली पण त्यावेळी दरवाजा बंद होता. आईने तिला दरवाज उघडण्यासाठी हाक मारली पण आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आई घाबरली आणि सर्वांना बोलावून घेतलं.
सर्वांनी बरेच प्रयत्न केले, पण शेवटी अखेर मुलीच्या रूमचा दरवाजा तोडला. आतमध्ये पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला. अल्पवयीन मुलीने आपल्या बेडशीटच्या मदतीने गळ्याला फास लावत स्वत: संपवलं. घरच्यांनी पोलिसांना बोलावून घेतले त्यानंतर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. ही घटना उत्तराखंडच्या उधमसिंह जिल्ह्यामध्ये घडली आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईलची जास्त सवय लावू नका, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.