गावाकडे परतलेल्या नातवाचा आजोबासह दुर्दैवी अंत; बसने धडक दिली आणि दुचाकी चिरडली

काही वेळ ओळख न पडल्याने पोलिसांची धावपळ झाली. परंतु व्हाट्सअप आणि फेसबूकची मदत झाली. ओळख पटण्यास माध्यमांचची महत्त्वाचं भूमिका ठरली आहे.

गावाकडे परतलेल्या नातवाचा आजोबासह दुर्दैवी अंत; बसने धडक दिली आणि दुचाकी चिरडली
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 10:52 AM

परभणी : सुट्या कुणाला नको असतात. कामातून तणाव कमी करण्यास त्या मदत करतात. असाच एक युवक सुट्यांनिमित्त गावाकडे गेला. तिथं आनंदात सुट्या घालवण्याचा त्याने विचार केला. ज्या आजोबांनी आपल्याला लहानपणी खेळवलं त्या आजोबांसोबत तो फिरायला गेला होता. पण, काळाने त्यांच्यावर झडप घातली. यात दोघांचाही मृत्यू झाला.सुट्या असल्याने श्रीनिवास शिंदे हा आजोबांना घेऊन गावाकडे जात होता. बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना गंगाखेड-लोहा राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघाताची घटना घडताच खासगी वाहनाने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, मृतकांची ओळख पटत नव्हती. अखेर रावराजूर येथील हे दोघेही आजोबा आणि नातू असल्याचे कळले. त्यानंतर रुग्णालयात गर्दी झाली. परभणीच्या पालम तालुक्यातील रावराजुर ठिकाणाहून आजोबा आणि नातू मोटरसायकलवर गंगाखेड येत होते. मालेवाडी पाठीजवळच त्यांच्या वर काळाने घाला घातला.

गंगाखेडकडे येत असताना अपघात

25 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान कळंब या ठिकाणाहून नांदेडकडे जाणारी बस मालेवाडी पाटील जवळ आली असता ही घटना घडली. राजुरवरून येणारी मोटरसायकल आजोबा आणि नातू गंगाखेडकडे येत असतानाच हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये आजोबा शिवाजी किशनराव शिंदे (वय 65 वर्षे) व नातू श्रीनिवास कल्याणराव शिंदे (वय 19) वर्षे राहनार रावराजूर ता. पालम हे जागीच मरण पावले आहेत.

मृतकांची ओखळ व्हॉट्सअपच्या मदतीने झाली

या घटनेची माहिती गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त मृत व्यक्तींना तात्काळ रावन भालेराव यांच्या अम्बुलसच्या साह्याने उचलून उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड या ठिकाणी आणले आहे. काही वेळ ओळख न पडल्याने पोलिसांची धावपळ झाली. परंतु व्हाट्सअप आणि फेसबूकची मदत झाली. ओळख पटण्यास माध्यमांचची महत्त्वाचं भूमिका ठरली आहे. आजोबा आणि नातू अचानक गेल्याने नातेवाईकांसह गावांत शोककळा पसरली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.