Husband-Wife Dispute : व्हिडिओ कॉलवर पती-पत्नी गप्पा मारत होते, कॉल चालू असतानाच अचानक पतीने जीवन संपवले; कारण काय?
व्हॉट्सअपवर सुसाईड नोटही पाठवली. त्यानंतर व्हिडिओ कॉल चालू असतानाच पत्नीसमोर आत्महत्या केली. पत्नीने त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्याने ऐकले नाही.
कोलकाता : व्हिडिओ कॉलवरुन पती-पत्नी रात्री गप्पा मारत होते. अचानक त्यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाला आणि पतीने टोकाचे पाऊल उचलले. पत्नीसमोरच पतीने व्हिडिओ समोर गळफास घेत पतीने आत्महत्या केली. पत्नीने त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र पती ऐकला नाही. पत्नीने तात्काळ गरफा पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घरी दाखल झाले, मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. मयत व्यक्ती कोलकातामधील एका बँकेत नोकरी करतो, तर पत्नी दोन मुलींसह अहमदाबादमध्ये राहते. याप्रकरणी गरफा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
एका खाजगी बँकेत वरिष्ठ पदावर नोकरी करतो
प्रसून बॅनर्जी असे मयत व्यक्तीचे नाव आहे. प्रसून एका खाजगी बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावर काम करत होता. याआधी तो गुजरातमधील अहमदाबाद शहरात नोकरी करत होता. दहा महिन्यांपूर्वीच त्याची बदली कोलकातामध्ये झाली होती.
पत्नी आणि मुले अहमदाबादमध्ये राहतात
प्रसूनची पत्नी अपर्णा बंदोपाध्याय ही दोन मुलांसह अहमदाबादमध्येच राहत होती. रविवारी रात्री पती-पत्नी रात्री व्हिडिओ कॉलवर बोलत होते. यादरम्यान त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. यानंतर पतीने पत्नीला आत्महत्येची धमकी दिली.
व्हॉट्सअपवर सुसाईड नोट पाठवली
व्हॉट्सअपवर सुसाईड नोटही पाठवली. त्यानंतर व्हिडिओ कॉल चालू असतानाच पत्नीसमोर आत्महत्या केली. पत्नीने त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्याने ऐकले नाही.
पत्नीने तात्काळ तेथील स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती देत पतीच्या फ्लॅटवर पोहचण्यास सांगितले. पोलिसांनी तात्काळ फ्लॅटमध्ये दाखल होत दरवाजा ठोठावला. मात्र आतून प्रतिसाद येत नसल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
पोलिसांनी आत जाऊन पाहिले असता प्रसून लटकलेल्या अवस्थेत दिसला. याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.