पत्नी दररोज कुणाशी तरी फोनवर बोलायची, पतीला राग अनावर झाला अन्…
पुष्पा ही सतत कुणाशी तरी फोनवर बोलायची. ही बाब कुलवंतला खटकत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यात भांडण होत होते.
लखनौ : मोबाईलचा अति वापर किती घातक आहे हे अनेक वेळा पाहिलं असेल. पती-पत्नीच्या नात्यातही दुरावा निर्माण करण्यास मोबाईल कारणीभूत ठरत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) उघडकीस आली आहे. पत्नी सतत मोबाईलवर बोलत असल्याने (Constantly talking on the mobile phone) रागाच्या भरात पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. पती-पत्नीच्या या वादात (Husband-Wife Dispute) मुलं मात्र पोरकी झाली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कुलवंत सिंह आणि पुष्पा सिंह अशी पती-पत्नीची नावे आहेत.
काय आहे प्रकरण ?
सिंह कुटुंबीय मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. कामानिमित्त ते उत्तर प्रदेशातील लखनौ येथे राहत होते. पुष्पा ही सतत कुणाशी तरी फोनवर बोलायची. ही बाब कुलवंतला खटकत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यात भांडण होत होते.
बुधवारी सकाळी कुलवंतचे दोन्ही मुलगे कोचिंग क्लासला गेले होते. दुपारी 12 वाजता जेव्हा मुलं कोचिंग क्लासवरुन घरी आली, तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. मुलांना आई-वडिल दोघेही मृतावस्थेत आढळले.
मुलांचा आरडाओरडा ऐकून शेजारी आले
कुलवंत सिंह याने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. मृतदेह पाहून मुलांनी आरडाओरडा केल्याने शेजारी गोळा झाले. याबाबत शेजाऱ्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
घटनास्थळावरुन कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिलांमध्ये गेल्या दोन महिल्यांपासून वाद सुरु होते. आई फोनवर सतत बोलायची म्हणून आई-वडिलांमध्ये भांडण होत होते, असे मुलांनी सांगितले.
पुष्पा कोणीशी फोनवर वारंवार बोलायची याबाबत पोलीस तपास करत आहेत.