पहिला गेला म्हणून दुसरा नवरा केला, त्याने तिचाच काटा काढला; वाचा कुठे घडली ही धक्कादायक घटना

विवाहानंतर संगीता साहनी आणि शिवकुमार यांच्यात नेहमी लहान-सहान कारणातून भांडणे होत होती. भांडणातून शिवकुमार संगीताला मारहाणही करत होता.

पहिला गेला म्हणून दुसरा नवरा केला, त्याने तिचाच काटा काढला; वाचा कुठे घडली ही धक्कादायक घटना
घरगुती भांडणातून पतीकडून पत्नीची हत्याImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 7:11 PM

प्रविण चव्हाण, TV9 मराठी, पालघर : प्रत्येक जोडप्यामध्ये काही ना कारणावरुन कुरबुरी सुरु असतात. काही याकडे दुर्लक्ष करतात. तर काही क्षुल्लक कारणातून टोकाला जातात. पालघर जिल्ह्यात क्षुल्लक कारणातून (Minor Dispute) घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. दररोजच्या भांडणातून पतीने पत्नीला संपवल्याची (Husband Killed Wife) घटना डहाणू तालुक्यातील आढवाणा गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कासा पोलिसांनी आरोपीला अटक (Kasa Police Arrested Accuse) केली आहे. शिवकुमार सहानी असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.

पहिल्या पतीच्या निधनानंतर दुसरा विवाह केला

संगीता सहानी असे मयत महिलेचे नाव आहे. संगीताचा पहिला पती प्रकाश करबट याचे निधन झाले होते. संगीता पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. पतीच्या निधनानंतर संगीताने शिवकुमार सहानी याच्यासोबत दुसरा विवाह केला.

पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे व्हायची

विवाहानंतर संगीता साहनी आणि शिवकुमार यांच्यात नेहमी लहान-सहान कारणातून भांडणे होत होती. भांडणातून शिवकुमार संगीताला मारहाणही करत होता.

हे सुद्धा वाचा

पतीकडून जीवघेणा हल्ला

रविवारी 2 ऑक्टोबर रोजीही मध्यरात्रीच्या सुमारास संगीता आणि शिवकुमारमध्ये कोणत्या तरी कारणातून कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातून संतापलेल्या शिवकुमारने संगीतावर बॅटरी मारुन आणि डोके आपटून जीवघेणा हल्ला केला.

मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू

या मारहाणीत संगीता गंभीर जखमी झाली होती. मात्र नंतर तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मुलाने याबाबत कासा पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कासा पोलिसांनी 302 अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी शिवकुमारला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला.
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.