पतीने तीन दिवस जेवण केले नाही, संतापलेल्या पतीने केली बेदम मारहाण; मग…

घरी आल्यानंतर पतीने पाहिले की पत्नी घरी जेवण बनवत नाही, तसेच घरातील कामेही करत नाही. त्याने पत्नीला जेवण न करण्याचे कारण विचारले. मात्र तिने काहीच उत्तर दिले नाही.

पतीने तीन दिवस जेवण केले नाही, संतापलेल्या पतीने केली बेदम मारहाण; मग...
कानपूरमध्ये मुलाने आईच्या प्रियकराला संपवलेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 9:35 PM

रायगड : तीन दिवस पत्नीने जेवण बनवले नाही म्हणून संतापलेल्या पतीने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमधील रायगडमध्ये घडली आहे. याप्रकरणी हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सुंदर मोती कोरवा असे 30 वर्षीय मयत पत्नीचे नाव आहे तर लक्ष्मण कोरवा असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याने गावात खळबळ माजली आहे.

आरोपी पती मोलमजुरीची कामे करायचा

धर्मजयगडमधील गणेशपूर गावात लक्ष्मण कोरवा, त्याची पत्नी सुंदर मोती कोरवा आणि त्याची चार मुले राहतात. लक्ष्मण कोरवा हा मजुरीचे काम करतो. महिनाभरापूर्वीच तो मोलमजुरीसाठी गावातील काही लोकांसोबत तामिळनाडूला गेला होता. यानंतर 30 डिसेंबर रोजी तो घरी परतला.

तीन दिवस पत्नीने जेवण न केल्याने वाद

घरी आल्यानंतर पतीने पाहिले की पत्नी घरी जेवण बनवत नाही, तसेच घरातील कामेही करत नाही. त्याने याबाबत गावातील पटेल कुंजराम कोरवा यांनाही सांगितले होते. यानंतर त्याने पत्नीला जेवण न करण्याचे कारण विचारले. मात्र तिने काहीच उत्तर दिले नाही.

हे सुद्धा वाचा

वादावादीतून भिंतीवर डोके आपटल्याने पत्नीचा मृत्यू

पत्नी काहीच बोलत नसल्याने लक्ष्मणला आणखी राग आला. त्याने रागाच्या भरात पत्नीला थोबाडात मारली. यानंतर पत्नीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. यामुळे लक्ष्मणने भिंतीवर तिचे डोके आपटले. यात तिचा मृत्यू झाला.

गावातील ग्रामस्थ पटेल यांनी धर्मजयगड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सुंदर मोती कोरवा हिचा मृतदेह पडून होता. तिच्या डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी कुंजराम कोरवा यांच्या फिर्यादीवरून आरोपी लक्ष्मण कोरवा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नातेवाईकांचीही चौकशी करत आहेत.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....