रोज जेवण बनवून देणाऱ्या बायकोचा त्याने ‘या’ साध्या कारणाने जीव घेतला !

पती कामावरुन आला तर घरी जेवण तयार नव्हते. यामुळे पतीचा रागाचा पारा चढला आणि संतापाच्या भरात त्याने नको ते केले. यानंतर तीन महिन्यांचे बाळ आईच्या मायेला पोरके झाले आहे.

रोज जेवण बनवून देणाऱ्या बायकोचा त्याने 'या' साध्या कारणाने जीव घेतला !
नागपुरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 8:07 PM

दिल्ली : दिल्ली शहराजवळ भालस्वा डेअरी परिसरात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पत्नीने जेवण बनवले नाही आणि घरातील कामं वेळेत करत नाही, म्हणून पतीने आजारी पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बजरंगी गुप्ता असे आरोपी पतीचे नाव आहे. बजरंगीची पत्नी प्रीती हिची अलिकडेच प्रसुती झाली होती. प्रसुतीनंतर ती अशक्त झाली होती. आरोपीने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

तीन महिन्यांपूर्वीच महिलेची प्रसुती झाली होती

बजरंगी आणि प्रीतीचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर तो नेहमी प्रीताला मारहाण करायचा. तीन महिन्यांपूर्वीच प्रीतीला बाळ झाले होते. प्रसुतीमुळे प्रीतीला कमजोरी आली होती. यामुळे ती नियमित जेवण करु शकत नव्हती. मात्र पती तिच्यावर आळशी आणि घरकामात इच्छा नसल्याचा आरोप करायचा. रविवारी रात्री तो कामावरुन घरी आला तेव्हा घरी जेवण बनले नव्हते. यामुळे बजरंगीचा रागाचा पारा चढला आणि त्याने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली.

मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने पत्नीचा मृत्यू

यानंतर संतापाच्या भरात बजरंगीने लाकडी दांडक्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीत प्रीती गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळली. यानंतर बजरंगी घरातून पळून गेला. नातेवाईकांनी प्रीतीला बुरारी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी प्रीतीच्या आईचा जबाब नोंदवत गुन्हा दाखल केला. यानंतर बजरंगीचा शोध घेत पोलिसांनी त्याला अटक केली.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.