किरकोळ वादातून माथेफिरु पतीने पत्नीला संपवले, पत्नीच्या मृत्यूनंतर थांबला नाही; काय आहे प्रकरण ?

अजय हा नेहमी पत्नी वर्षाला त्रास द्यायचा. छोट्या छोट्या कारणावरुन पत्नीला मारहाण करायचा. वर्षा वारंवार याबाबत आपल्या माहेरच्यांकडे तक्रार करत होती. मात्र कुटुंबीय तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवायचे.

किरकोळ वादातून माथेफिरु पतीने पत्नीला संपवले, पत्नीच्या मृत्यूनंतर थांबला नाही; काय आहे प्रकरण ?
वीजेचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 2:49 PM

उत्तर प्रदेश : किरकोळ वादातून माथेफिरु पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला (Husband Attack on Wife) करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी (Uttar Pradesh, Barabanki) जिल्ह्यात घडली आहे. शेजाऱ्यांना या प्रकरणाची चाहूल लागताच त्यांनी तात्काळ आरोपीच्या घराकडे धाव घेत त्याला पकडले. आरोपीला बेदम मारहाण (Beating) करत पोलिसांच्या हवाली केले. अजय कुमार असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.

उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यातील सतरिख पोलीस ठाण्याअंतर्गत जैनाबाद मजरे बबुरिहा गावात ही थरारक घटना घडली आहे. अजय कुमारचा 15 वर्षांपूर्वी सिकदंरपूरमधील वर्षा हिच्याशी झाला होता.

आरोपी नेहमी पत्नीशी वाद घालायचा, मारहाण करायचा

अजय हा नेहमी पत्नी वर्षाला त्रास द्यायचा. छोट्या छोट्या कारणावरुन पत्नीला मारहाण करायचा. वर्षा वारंवार याबाबत आपल्या माहेरच्यांकडे तक्रार करत होती. मात्र कुटुंबीय तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवायचे, असे पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

नेहमीप्रमाणे किरकोळ वाद झाला अन् आरोपीने पत्नीने संपवले

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा घरी खाटेवर झोपली होती. यावेळी नेहमीप्रमाणे अजय आणि तिच्यामध्ये किरकोळ कारणातून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अजयने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वर्षाचा जागीच मृत्यू झाला. इतका खुन्नसमध्ये होता की, महिलेच्या मृत्यूनंतरही पती वार करतच होता.

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपी अटक

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले. आरोपीकडून पत्नीच्या हत्येत वापरलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...