एकाने नाक कापले तर दुसऱ्याने गळाच चिरला; पती-पत्नीमध्ये नक्की काय घडले?

जिल्ह्यातील नालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशलपुरा गावात ही घटना घडली आहे. गावातील रहिवासी त्रिलोक पाटीदार आणि त्यांची पत्नी बबिता पाटीदार हे शेतात मजुरीसाठी गेले होते. शेतातच काही कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला.

एकाने नाक कापले तर दुसऱ्याने गळाच चिरला; पती-पत्नीमध्ये नक्की काय घडले?
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 7:29 PM

आगर माळवा : मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात पती-पत्नीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणातून झालेल्या वाद पत्नीच्या जीवावर बेतला आहे. शेतात काम करत असतानाच पती-पत्नीमध्ये काही कारणावरुन वाद झाला. या वादातून पत्नीने आधी पत्नीचे नाक कापले. यामुळे संतापलेल्या पतीने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात पत्नीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर आरोपी पतीलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आरोपी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बबिता पाटीदार आणि त्रिलोक पाटीदार अशी पती-पत्नीची नावे आहेत.

शेतात काम करत असतानाच झाला वाद

जिल्ह्यातील नालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशलपुरा गावात ही घटना घडली आहे. गावातील रहिवासी त्रिलोक पाटीदार आणि त्यांची पत्नी बबिता पाटीदार हे शेतात मजुरीसाठी गेले होते. शेतातच काही कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला.

आधी पतीचे नाक कापले, मग पत्नीवर वार केले

भांडण इतके विकोपाला गेले की बबिता हिने पतीच्या नाकावरच धारदार शस्त्राने वार केला. यात पती त्रिलोकचे नाक कापले. यामुळे तो चांगलाच संतापला. त्रिलोकनेही हातात धारदार शस्त्र घेऊन पत्नी बबिताच्या मानेवर वार केले.

हे सुद्धा वाचा

रक्तस्त्राव झाल्याने पत्नीचा मृत्यू

यात बबिताच्या मानेवर तीव्र जखम होऊन रक्तस्त्राव झाल्याने तिचा काही वेळातच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नालखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसडीओपी पल्लवी शुक्ला यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

कौटुंबिक कारणातून वाद झाल्याचे निष्पन्न

एसडीओपी पल्लवी शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणातून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. दरम्यान, दोघांनी एकमेकांवर विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात पतीचे नाक कापले गेले आणि पत्नीचा मृत्यू झाला.

जखमी पतीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी शेतातून विषाची बाटलीही जप्त केली आहे. पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.