Nagpur Crime : समोर चोराच्या हातात चाकू, नागपुरात 85 वर्षाच्या युवकानं झुंज दिली, घाव झेलले पण चोरी होऊ दिली नाही

वयोवृद्ध व्यक्ती घरामध्ये एकटी असल्याचा पाहून या चोट्याने हिंमत केली. मात्र या वृद्ध व्यक्तीने तर प्रतिकार केला.

Nagpur Crime : समोर चोराच्या हातात चाकू, नागपुरात 85 वर्षाच्या युवकानं झुंज दिली, घाव झेलले पण चोरी होऊ दिली नाही
नागपुरात 85 वर्षाच्या युवकानं हिंमत हारली नाहीImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 7:37 PM

नागपूर : समोर चाकू नवजवान युवक. पण, घरची चोरी होऊ दिली नाही. अशा ज्येष्ठ व्यक्तीनं कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांच्या शौर्याचं नागपुरात कौतुक होतंय. पण, चाकूचा घाव त्यांना सहन करावा लागला. नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या 85 वर्षाच्या नवजवानाने एका चोराशी झुंज दिली. चोराला परतून लावले. घरामध्ये होणारी चोरी वाचवली. मात्र यामध्ये हा 85 वर्षाचा नवजवान जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार (hospital treatment) सुरू आहेत. सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीत जयप्रकाशनगर (Jaiprakashnagar) येथे शरदचंद्र कोलटकर ( Sharadchandra Kolatkar) नावाचे 85 वर्षे वयाचे गृहस्थ राहतात. त्यांच्यासोबत पत्नी राहते. सकाळी नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास त्यांच्या घरामध्ये एक 35 ते 40 वर्ष वयोगटातील युवक शिरला. त्याने चाकू दाखवत घर का सामान्य निकाल पैसे दो, अशा प्रकारची मागणी केली.

नेमकं काय घडलं

शरदचंद्र कोलटकर यांनी काय का सामान असा विचारत त्याला उत्तर दिलं. मात्र त्या चोरट्याने चाकूने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 85 वर्षे वृद्धाने त्याच्याशी झुंज दिली. त्याच्यासोबत होत असलेली झटापट बघता त्यांच्या पत्नी सुद्धा धावत बाहेर आल्या. मात्र त्या चोरट्याने त्यांच्या गळ्यावर चाकूचा एक घाव मारला. आपला प्रतिकार करत असल्याचा पाहून त्याने पळ काढला. बाहेरून दरवाजा लावून घेतला. मात्र या झटापटीत 85 वर्षीय वृद्ध जखमी झाले. मात्र त्यांनी हिम्मत दाखवत घरात होणारी चोरी वाचवली. या शौर्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे. पोलीस आता या चोरट्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती सोनेगावचे पोलीस उपनिरीक्षक वैभव नाईक यांनी दिली.

घरात एकटं राहता पोलिसांना कळवा

शहरात काही ठिकणी ज्येष्ठ लोकं राहतात. अशावेळी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. वयोवृद्ध व्यक्ती घरामध्ये एकटी असल्याचा पाहून या चोट्याने हिंमत केली. मात्र या वृद्ध व्यक्तीने तर प्रतिकार केला. प्रत्येकच जण हा करू शकेल, असं नाही. त्यामुळे आपण जर एकटे घरात राहत असाल तर पोलिसांना त्याची माहिती द्या, अशा प्रकारचं आवाहन पोलिसांनी केलंय.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.