ट्रेनमध्ये 2 मोठ्या बॅगांसह बसलेला संशियत, RPF च्या जवानाने विचारलं आत काय? उघडल्यावर सगळेच गेले हादरून

भारतामध्ये आपल्या सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत त्यामुळे नागरिक सुरक्षित आहेत. ट्रेनमधून रोज लाखो लोक प्रवास करतात. पण यामध्ये काहीजण ट्रेनचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करताना दिसतात. अशाच प्रकारे एकजण ट्रेनमधून प्रवास करत होता मात्र आरपीएफच्या जवानांनी त्याचा भांडाफोड केला.

ट्रेनमध्ये 2 मोठ्या बॅगांसह बसलेला संशियत, RPF च्या जवानाने विचारलं आत काय? उघडल्यावर सगळेच गेले हादरून
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 9:29 PM

जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळं असणाऱ्यांपैकी भारत देश एक आहे. भारतामधील लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकल सेवेनेच लोक प्रवास करतात. भारतातील रेल्वे सेवा सुरळित राहण्यासाठी अनेक हात काम करत असतात. यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ आणि जीआरपीचे जवानही काम करतात. ट्रेनच्या मदतीने कोणी चुकीचं काही नेलं तर? चुकीच्या कामांसाठी रेल्वेचा वार होऊ नये म्हणून जवान डोळ्यात तेल घालून नजर ठेवत असतात. थोडीफार काही संशयास्पद हालचाल किंवा एखादी गोष्ट जवानांना दिसली की त्याचा निकाल ते लावतातच. अशाच प्रकारची एक बातमी समोर आली आहे.

दक्षिण एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 12722) मधून एक व्यक्ती दोन मोठ्या बॅगा घेऊन जात होता.ट्रेनच्या शेवटच्या डब्यामध्ये बॅग घेऊन एक व्यक्ती बसला होता. दुपारचे अडीच वाचले होते, आरपीएफचे जवान या डब्यात पाहोचले. दोन मोठ्या बॅग पाहून त्यांनी विचारलं बॅगमध्ये काय आहे? सुरूवातीला आरपीएफच्या जवानांना त्याने बॅग उघडून दाखवण्यास नकार दिला. पण त्यांनी त्याच्यावर दबाव टाकला आणि बॅग उघडायला लावली. पण जेव्हा बॅग उघडली तेव्हा डब्यामधील सगळेच प्रवासी हादरून गेले.

दोन्ही बॅग उघडल्यावर त्यामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी आधीच गुप्त माहिती मिळाली होती की, या ट्रेनमधून अशी दारूची तस्करी होणार आहे. त्यानुसार आरपीएफच्या जवानांनी सापळा लावत त्याला अटक केली.पण महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना त्याकडे दोन किंवा तीन डझन बाटल्या असल्याचं समजलं होतं. मात्र जेव्हा दोन्ही बॅग उघडल्या तेव्हा तब्ब्ल 225 इंग्रजी दारूच्या बाटल्या सापडल्या.

दरम्यान, संबंधित व्यक्तीला आरपीएफच्या पोलिसांन ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यावर तो एक दारू तस्कर असून त्याचं नाव समरसिंग चौहान असल्याचं समोर आलं. बिहारमधील औरंगाबाद येथील रहिवासी आहे. मध्य प्रदेशमधील मुलताई स्टेशनवर ही कारवाई करण्यात आली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.