‘या’ ऑनलाईन शॉपिंग साईटवर ऑर्डर केला लॅपटॉप, मात्र पार्सल मिळाल्यानंतर ग्राहक हैराण

चिन्मयाने हा लॅपटॉप आपल्या मित्रासाठी ऑर्डर केला होता. ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर चिन्मयाने ट्विटवर ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे.

'या' ऑनलाईन शॉपिंग साईटवर ऑर्डर केला लॅपटॉप, मात्र पार्सल मिळाल्यानंतर ग्राहक हैराण
ऑर्डर केला लॅपटॉप, पण मिळाला दगडImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 7:30 PM

मंगलोर : आजकाल ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दुकानात गर्दी उभे राहण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग करण्याचा ट्रेंड (Online Shopping Trend) अधिक वाढला आहे. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. मंगलोरमध्ये ऑलनाईन फसवणुकीची (Online Fraud) अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवर (Flipkart Online Shopping Site) गेमिंग लॅपटॉप ऑर्डर केला होता. मात्र प्रत्यक्ष जेव्हा ऑर्डरची डिलिव्हरी झाली तेव्हा बॉक्समध्ये लॅपटॉपऐवजी दगड निघाला.

सध्या दिवाळी सण सुरु असल्याने ऑनलाईन शॉपिंग साईटवरही फेस्टिव्ह सिझन सुरु आहे. ऑनलाईन शॉपिंग साईट अमेझॉनवरही सध्या बिग दिवाली सेल सुरु आहे.

गेमिंग लॅपटॉप ऑर्डर केला होता

कर्नाटकमधील मंगलोरमधील रहिवासी असलेले चिन्मया नामक व्यक्तीने Flipkart Big Diwali Sale मध्ये एक गेमिंग लॅपटॉप ऑर्डर केला होता. मात्र जेव्हा ऑर्डर डिलिव्हर झाली आणि बॉक्स उघडून पाहिला तेव्हा आत एक मोठा दगड आणि कॉम्प्युटरचे जुने पार्ट्स आढळले.

हे सुद्धा वाचा

पीडिताने ट्विट करत दिली फसवणुकीची माहिती

चिन्मयाने हा लॅपटॉप आपल्या मित्रासाठी ऑर्डर केला होता. ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर चिन्मयाने ट्विटवर ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. चिन्मयाने दिलेल्या माहितीनुसार हे फ्लिपकार्ट प्लस अॅश्युअर्ड उत्पादन होते पण तरीही या उत्पादनासोबत ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्याय उपलब्ध नव्हता.

बॉक्स बाहेरून चांगला दिसत होता. त्यामुळे पीडित व्यक्तीने डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ओटीपी सांगितला. बॉक्स उघडताच आसूसचा बॉक्स ओपन होता. तसेच बारकोड आणि प्रोडक्ट डील काढल्याचे दिसून आले.

पीडिताची रिटर्न रिक्वेस्ट अमान्य

आसुस बॉक्स ओपन करुन पाहिले असता बॉक्समध्ये काही जुने कॉम्प्युटर पार्ट्स आणि दगड यासह ई-वेस्ट होते. बॉक्समध्ये दगड सापडल्यानंतर पीडिताने रिटर्नची रिक्वेस्ट टाकली, मात्र सेलरने ती मान्य केली नाही. फ्लिपकार्टने जेव्हा सेलरशी याबाबत संपर्क साधला तेव्हा सेलरने आपण योग्य प्रोडक्ट पाठवल्याचे सांगितले.

Non Stop LIVE Update
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.