Dombivali Crime :पोलीस असल्याची बतावणी करत घेऊन गेले, दोघांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पीडित मुलगी इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असून, शुक्रवारी दुपारी मित्रासोबत डोंबिवली लागून असलेल्या ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात फिरायला गेली होती. यावेळी दोघे आरोपी तेथे आले आणि त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी केली.

Dombivali Crime :पोलीस असल्याची बतावणी करत घेऊन गेले, दोघांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 2:31 PM

डोंबिवली : कल्याण आणि डोंबिवली शहरात गेल्या दोन वर्षात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डोंबिवली आणि कल्याण ही दोन्ही शहर या अगोदर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली असताना पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष बाब म्हणजे पोलीस असल्याची बतावणी करत दोघांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. मोठ्या साहेबांकडे चौकशीसाठी नेण्याचा बहाणा करत निर्जन ठिकाणी नेत दोघांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे. दोघेही आरोपी फरार असून, विष्णुनगर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मित्रासोबत फिरायला गेली असताना ही घटना घडली आहे.

मित्रासोबत फिरायला गेली होती मुलगी

पीडित मुलगी इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असून, शुक्रवारी दुपारी मित्रासोबत डोंबिवली लागून असलेल्या ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात फिरायला गेली होती. यावेळी दोघे आरोपी तेथे आले आणि त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी केली.

पोलीस असल्याची बतावणी करत बलात्कार

इतकंच नाही तर तुम्ही इथे फिरताय हे तुमच्या पालकांना सांगण्याची धमकीही त्यांनी दिली. यापैकी एक तरुण मुलीच्या मित्राला घेऊन स्टेशन परिसरात गेला. आमचे साहेब इथे बसले तू त्यांच्याशी बोल असं सांगत त्याने तरुणाला गुंतून ठेवलं.

हे सुद्धा वाचा

दरम्यानच्या वेळात दुसरा आरोपी हा तरुणीला घेऊन काही अंतरावर गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. दुसरा आरोपीही मुलाला सोडून पुन्हा त्या ठिकाणी आला आणि त्यानेही मुलीवर बलात्कार केला. हा सर्व प्रकार मुलीने आपल्या घरच्यांना सांगितला.

विष्णुनगर पोलिसात गुन्हा दाखल

सुरवातीला रेल्वे पोलिसंकडे तक्रार करण्यात आली. मात्र नंतर हे प्रकरण शहर पोलिसांकडे येत असल्याने रात्री बारा वाजता विष्णुनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. तपासासाठी पाच पथकं नेमण्यात आली आहेत.

ठाकुर्ली खाडी किनारा, बावन चाळ परिसर निर्जन असल्याने तरुण-तरूणींनी या ठिकाणी जाणं टाळावे अशा भावना व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी बावन चाळ परीसरातही अशीच घटना घडली होती.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.