कोणत्याही बॉयफ्रेंड-गर्लफेंडसह अशी घटना घडू नये; त्याला बांधून ठेवलं आणि त्याच्यासमोरच तिच्यावर…
यानंतर नराधमांनी मुलीच्या प्रियकराला बांधून ठेवले आणि त्यांनी या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलगी आणि तिचा प्रियकर हे नराधमानसमोर आम्हाला सोडून द्या अशी विनवणी करत होते.

पाटणा : एकांतात प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या एका प्रेमी जोडप्याला कल्पनाही नसेल अशी अत्यंत भयानक घटना त्यांच्यासह घडली आहे. बॉयफ्रेंड समोरच त्याच्या गर्लफ्रेंड वर काही नराधमांनी बलात्कार केला आहे. बिहारमध्ये(bihar) घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस बलात्कार करणाऱ्या नराधमांचा शोध घेत आहेत.
बिहार मधील वैशाली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी ही 15 वर्षाची अल्पवयीन आहे. तिच्या गावात राहणाऱ्या नराधमांनीच तिच्यावर अत्याचार केला आहे.
पीडित मुलगी ही तिच्या प्रियकरासह एका ठिकाणी फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या गावातील ओळखीच्या तरुणांनी या दोघांना पाहिले. यानंतर या टोळक्याने त्या दोघांना बांधून ठेवले आणि त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ हे नराधम त्यांना त्रास देत होते.
यानंतर नराधमांनी मुलीच्या प्रियकराला बांधून ठेवले आणि त्यांनी या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलगी आणि तिचा प्रियकर हे नराधमानसमोर आम्हाला सोडून द्या अशी विनवणी करत होते.
मात्र, आम्ही सगळ्या गावासमोर तुमचं हे प्रेम प्रकरण जाहीर करून असं म्हणत मुलीवर अत्याचार सुरुच ठेवला. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी बलात्कार करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ व्हायरल केला.
अखेरीस नराधम घटनास्थळावरून फरार झाले. यानंतर पीडित मुलीने प्रियकराच्या मदतीने पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार दाखल केली.
10 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. वैशाली जिल्ह्यातील जहादा पोलीस ठाण्यात या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. व्हिडिओच्या आधारे पोलीस बलात्कार करणाऱ्या नराधमांचा शोध घेत आहेत.