मुलीच्या हत्येच्या आरोपीखाली बाप आणि भाऊ तुरुंगात गेले, तीन वर्षांनी जे समोर आले ते पाहून पोलीसही चक्रावले !

अल्पवयीन अचानक घरुन गायब झाली. घरच्यांनी, पोलिसांनी खूप शोध घेतला, पण मुलगी सापडली. त्यानंतर सात वर्षांनी घराजवळ जमिनीत सांगाडा सापडला आणि मुलीच्या हत्येप्रकरणी बाप आणि भावाला तुरुंगवास झाला. पण नंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं.

मुलीच्या हत्येच्या आरोपीखाली बाप आणि भाऊ तुरुंगात गेले, तीन वर्षांनी जे समोर आले ते पाहून पोलीसही चक्रावले !
मृत घोषित केलेली मुलगी तीन वर्षांनी जिवंत परतलीImage Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 1:04 PM

छिंदवाडा : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक अल्पवयीन मुलगी सात वर्षापूर्वी घरुन अचानक गायब झाली. याप्रकरणी घरच्यांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. तपासादरम्यान वडिल आणि भावाने मुलीची हत्या केल्याचे कोर्टात निष्पन्न झाले. याप्रकरणी वडिल आणि भावाला तुरुंगवासाची शिक्षा झाली. वडिलांना एक वर्षानंतर जामीन मिळाला, तर भाऊ अद्याप तुरुंगात शिक्षा भोगत आहे. यानंतर सात वर्षांनी मुलगी अचानक घरी हजर झाली. या घटनेमुळे घरच्यांसह पोलीसही चक्रावले.

मुलीची चौकशी केली असता तिने सांगितले की, ती रागाच्या भरात घरुन निघून गेली होती. आता ती सज्ञान झाली असून, तिचा विवाहही झाला आहे. सध्या ती पतीसोबत उज्जैनमध्ये राहते. मुलीने पोलिसांवर वडिल आणि भावाला खोट्या केसमध्ये अडकवल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दबाव टाकत वडिल आणि भावाला गुन्हा कबुल करण्यास भाग पाडले, असे मुलीने सांगितले.

काय घडले नेमके?

सिंगोडी पोलीस ठाण्याअंतर्गत जोपनाला गावातील एक 15 वर्षाची मुलगी 2014 मध्ये अचानक घरुन बेपत्ता झाली. घरच्यांनी मुलीचा खूप शोध घेतला, पण मुलगी सापडली नाही. मग नातेवाईकांनी सिंगोडी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीस मुलीचा लगातार शोध घेत होते. यानंतर सात वर्षांनी पोलिसांनी मुलीच्या घराजवळ खोदकाम केले. यावेळी एक सांगाडा आढळला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी न्यायालयात भावाने बहिणीची हत्या केली आणि वडिलांच्या मदतीने मृतदेह जमिनीत पुरल्याचे आपल्या अहवालात सांगितले. यानंतर वडिल आणि भावाला न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. वडिलांना एक वर्षानंतर जामीन मिळाला, मात्र भाऊ अद्याप तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

सात वर्षांनी मुलगी अचानक घरी परत आली. मुलीला जिवंत पाहून घरच्यांसह गावकरीही हैराण झाले. यानंतर मुलगी सिंगोडा पोलीस ठाण्यात गेली आणि सर्व हकीकत सांगितली. मुलगी जिवंत असल्याने पोलिसांना मिळालेला सांगाडा नक्की कुणाचा आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.