सिनेमात दाखवल्याप्रमाणे डॉन बनायचे होते, स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पवयीन मुलाने केले ‘हे’ भयानक कृत्य

आरोपी मुलगा 15 वर्षांचा आहे. त्याने 15 दिवसांपूर्वी आपल्या मोबाईलवर पंजाबी अॅक्शन फिल्म पाहिली होती. त्यानंतर फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे तो डॉन बनण्याची स्वप्नं पाहू लागला.

सिनेमात दाखवल्याप्रमाणे डॉन बनायचे होते, स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पवयीन मुलाने केले 'हे' भयानक कृत्य
पैशाच्या वादातून तरुणाला मारहाण
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 3:24 PM

दिल्ली : राजधानीत गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. डॉनचे बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने एका तरुणाची हत्या केल्याची घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. आरोपीने तब्बल 45 वेळा तरुणावर चाकूने वार करत त्याला संपवले. हर्ष असे हत्या करण्यात आलेल्या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी त्याचा मोबाईल घेऊन पळाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

पंजाबी अॅक्शन फिल्म पाहून केले कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा 15 वर्षांचा आहे. त्याने 15 दिवसांपूर्वी आपल्या मोबाईलवर पंजाबी अॅक्शन फिल्म पाहिली होती. त्यानंतर फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे तो डॉन बनण्याची स्वप्नं पाहू लागला.

मोबाईल लुटण्याच्या हेतूने हत्या

यानंतर त्याने हर्षचा मोबाईल लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्ष याला विरोध करत होता, त्यानंतर आरोपीने त्याच्या साथीदारासह आधी चाकूने त्याचा गळा चिरला आणि नंतर सुमारे 45 वार केले.

हे सुद्धा वाचा

यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच तात्काळ आरोपींनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून हत्येत वापरलेला चाकूही हस्तगत केला आहे.

आरोपींची सुधारगृहात रवानगी

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. फिल्म पाहून शिकण्याच्या वयात मुलाने डॉन बनण्याचे स्वप्न पाहून हत्येसारखं भयानक कृत्य केल्याने पोलीसही हैराण झाले. आरोपींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.