‘फ्रेंड’ नावाच्या डेटींग एपच्या मदतीने मुंबईच्या महिलेला 68 हजाराला गंडा

जोगेश्वरीतील एका 35 वर्षीय महिलेची डेटींग एपद्वारे एकाशी मैत्री झाली. आपण लंडनला डॉक्टर असल्याचे या व्यक्तीने भासवत लुबाडणूक केली.

'फ्रेंड' नावाच्या डेटींग एपच्या मदतीने मुंबईच्या महिलेला 68 हजाराला गंडा
DATING APPImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 11:51 AM

मुंबई : मोबाईल डेटींग एपच्या ( DATINGAPP ) माध्यमातून अनेकांची फसवणूक केली जात आहे. मैत्रीच्या ( friendship ) नावाखाली आमीष दाखवून अनेकांना लाखो रूपयांना गंडा घातला जात आहे. याबाबत अनेकदा प्रबोधन करण्यात येऊनही लोक अशा लोकांच्या आमीषाला भुलून आपला वेळ आणि पैसा दोन्ही गमावत आहेत. अशाच एका प्रकरणात जोगेश्वरीच्या एका महिलेला एकाने ( LONDON ) लंडनचा डॉक्टर असल्याचे सांगत 68,500 रूपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

जोगेश्वरीतील एका 35 वर्षीय महिलेशी डेटींग एपद्वारे एकाने मैत्री केली. ‘फ्रेंड’ नावाच्या डेटींग एपमुळे या महिलेने एकाशी मैत्री केली. आपण लंडनचा डॉक्टर असल्याचे या व्यक्तीने सांगितले आणि तिला भेटण्यासाठी भारतात येणार असल्याचेही त्याने सांगितले. या दोघांमध्ये फोनवरही संपर्क सुरू झाला. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.

डेटींग एपद्वारे या महिलेची एका इसमाशी 26 जानेवारी रोजी ओळख झाली. आपल्याला जोडीदार मिळणार असल्यामुळे ही तरूणी आनंदात होती. आपण लंडनच्या ग्लासगो शहरातील डॉक्टर असल्याचे त्याने भासवले. आणि त्याच्यावर तिने विश्वास टाकला. दोघांमध्ये खूप चॅटींग झाली, त्याने तिला भारतात भेटायला येणार आहे असे सांगितले.

रविवारी अचानक त्याने आपण तिला भेटायला भारतात येत आहोत असे सांगितले. आणि सोमवारी तिला दिल्ली एअरपोर्टवरून एका महिलेचा फोन आला. या महिलेने तिच्या मित्राला एअरपोर्टच्या कस्टम अधिकाऱ्याने पन्नास लाख रूपयांचे विदेशी चलन आणल्या प्रकरणी पकडल्याचे सांगितले. त्यानंतर या महिलेने तिच्या मित्राला फोन दिला. त्याने सांगितले की आपण पन्नास लाख पौंड आणले आहेत, परंतू आपल्याला विमानतळावर पकडल्याने सुटकेसाटी काही पैशाची मदत हवी असे सांगितले. त्यानंतर महिलेने त्याला 68,500 रूपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.

आणि त्या महिलेला संशय आला….

दिल्ली विमानतळावर अडकलेल्या आपल्या मित्राच्या सुटकेसाठी 68,500 पाठवल्यानंतर काही वेळाने तिला आणखी एक फोन आला. आपल्याला वकीलांना देण्यासाठी 1.75 रूपये आणखी हवेत असे तिच्या मित्राने सांगितल्यावर तिला संशय आला. त्यामुळे तिने कस्टम विभागाच्या हेल्पलाईन फोन केला असता तिची फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम 419 आणि 420 तसेच आयटी कायद्याखाली तक्रार दाखल करीत तपास सुरू केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.