SBI च्या ग्राहकांना लावला जातोय ऑनलाईन चुना, असा मेसेज आल्यास लगेच व्हा सावध!
OTP मागून ठगबाजी करण्याचा फंडा आता जुना झाला आहे. अकाउंट रिकामे करण्यासाठी ठगबाजांनी आता नवीन फंडा शोधून काढला आहे.
मुंबई, इंटरनेटमुळे आपली अनेक कामे सुलभ झाली आहेत. पण अनेकजण त्याचा चुकीचा वापर करत आहेत. ठगबाजांसाठी इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा हात चालाखीसारखा झाला आहे. SBI च्या ग्राहकांना फसविण्यासाठी ठगबाजांचा नवीन फंडा (Phishing Attack) समोर आला आहे. आजकाल अनेक SBI च्या ग्राहकांना मेसेज पाठवला जात आहे. एसबीआयच्या नावाने हा मेसेज पाठवून ग्राहकांना पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगितले जात आहे.
वास्तविक, फसवणूक करणारे सामान्य लोकांना फसवण्यासाठी असा सापळा रचतात की वापरकर्ते सहजपणे त्यात अडकतात. एसबीआयच्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक असल्याने ठगबाजांनी त्यांनाच टार्गेट केले आहे.
काय आहे फिशिंग मेसेज
या मेसेजमध्ये असे लिहिले आहे की ‘प्रिय ग्राहक, तुमचे SBI YONO खाते आज बंद झाले आहे. ताबडतोब संपर्क साधा आणि तुमचा पॅन नंबर अपडेट करा. असा संदेश मिळाल्यावर, वापरकर्ता गोंधळला जाऊ शकतो आणि अलगतपणे ठगबाजानच्या जाळ्यात सापडतो. तुम्हाला असा कोणताही मेल किंवा मेसेज आला तर तुम्ही त्याची माहिती report.phishing@sbi.co.in वर शेअर करू शकता.
A #Fake message issued in the name of SBI is asking customers to update their PAN number to avoid their account from getting blocked#PIBFactCheck
▶️Never respond to emails/SMS asking to share your personal or banking details
▶️Report at?
✉️ report.phishing@sbi.co.in
?1930 pic.twitter.com/lYpXTln4qT
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 4, 2022
OTP चा फंडा झाला जुना
OTP मागून अकाउंट रिकामे करण्याचा फंडा आता जुना झाला आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीबद्दल आता मोठ्या प्रमाणात जागृती झालेली दिसते. बँक तसेच मोबाईल कंपन्या ग्राहकांना याबद्दल सतत सावध करीत असते, परिणामी ठगबाजांना यातून निराशा हाती लागत आहे. त्यामुळे ते नवनवीन फंडे शोधात असतात. बऱ्याचदा थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करून मोबाईलमधला डेटा चोरला जातो. याशिवाय फिशिंग लिंक तयार करून ती ग्राहकांना पाठविली जाते.