Dowry Death : मुलीची तब्येत माहेरचे मुलीला पहायला गेले, घरी पोहचताच पायाखालची जमिनच सरकली !
नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी दाखल दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नवविवाहितेच्या पती आणि सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गाझीपूर : कायदे अधिक कठोर होऊनही हुंड्यासाठी छळ करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. नवविवाहित महिलेने माहेरातून हुंडा म्हणून काहीच दिले नाही, या रागातून सासरच्या लोकांनी तिचा अमानुष छळ केला. याचदरम्यान तिला बेदम मारहाण करून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. गाझीपूर येथील सेवराई परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. नवविवाहित महिलेच्या पतीसह सासू-सासर्यांनी अमानुषपणे छळ केला आणि नंतर बेदम मारून करून तिची हत्या केली. याप्रकरणी नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी दाखल दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नवविवाहितेच्या पती आणि सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सेवराई येथील पोलीस ठाण्यातील वरीष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.
महिलेचे वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न
गहमर पोलीस ठाण्यांतर्गत देवल गावामध्ये नवविवाहितेच्या हत्येने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. मृत महिलेचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. अवघ्या वर्षभरात मुलीला सासरच्या छळाला कंटाळून प्राण गमवावा लागला. त्यामुळे माहेरचे लोक प्रचंड हादरले.
मृत नवविवाहित तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नवविवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध हुंड्यासाठी छळवणूक, फसवणूक आणि हत्या अशा प्रकारे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याच दरम्यान पोलीस पीडित महिलेच्या घराच्या आवारात इतर पुराव्यांचा शोध घेत आहेत. तसेच शेजारच्या लोकांचे जबाब नोंदवून पुढील तपास केला जात आहे.
मुलीचे वडिल राम धान प्रजापती यांनी या घटनेबाबत पोलिसांत तक्रार देऊन 24 वर्षीय मुलगी ज्योती कुमारी हिचा हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी मारझोड करून खून केल्याचा आरोप केला आहे. मुलीला मृतावस्थेत पाहून ते खालीच कोसळले होते.
ज्योती हिचे वर्षांपूर्वीच देवल गावातील सुरज प्रजापती याच्याशी लग्न झाले होते. शुक्रवारी सायंकाळी ज्योतीची तब्येत बरी नसल्याचे तिच्या माहेरच्या लोकांना सांगण्यात आले होते. त्या माहितीवरून माहेरचे लोक ज्योतीला पाहण्यासाठी आले होते. यावेळी मुलीला मृतावस्थेत पाहून ज्योतीच्या माहेरच्या लोकांच्या पायाखालील जमीनच सरकली.