Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नालासोपाऱ्यात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; 58 लाख 74 हजाराचे अंमलीपदार्थ जप्त

नालासोपारा येथील प्रगती नगर परिसरात कारवाई करत गुन्हे प्रकटीकरण शाखेने 58 लाखांचे ड्रग जप्त केले. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

नालासोपाऱ्यात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; 58 लाख 74 हजाराचे अंमलीपदार्थ जप्त
नालासोपाऱ्यात ड्रग कारवाई करत नायजेरियनला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 4:25 PM

नालासोपारा / विजय गायकवाड : नालासोपारा पूर्व प्रगती नगर परिसर हा नायजेरियन नागरिकांचा मोठा अड्डा बनला आहे. याच परिसरात तुळिंज पोलिसांनी मोठी कारवाई करत एका 26 वर्षीय नायजेरियन व्यक्तीला अटक केले. ईदे इम्यानुवेल ईदे पॉल असे अटक नायजेरियन नागरिकाचे नाव आहे. आरोपीकडून 58 लाख 74 हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. नालासोपारा परिसरातील ही सर्वात मोठी कारवाई असून, अंमली पदार्थसंबंधी आमच्या कारवाया अशाच सुरू राहतील, असे मीरा भाईंदर वसई विरार परिमंडळ 03 चे प्रभारी पोलीस उपयुक्त सुहास बावचे यांनी सांगितले.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला

आरोपी नालासोपारा पूर्व प्रगती नगर परिसरात राहत होता. तुळिंज गुन्हे प्रकटीकरण पथकाला प्रगती नगर परिसरात एका नायजेरियन नागरिकाकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा असून, तो विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरात सापळा रचला.

तुळिंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पीएसआय बाळासाहेब बांदल, सहाय्यक फोजदार शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, आनंद शिंदे, उमेश वरठा यांच्यासह अन्य पथक तयार केले. या पथकाने प्रगती नगर परिसरात सापळा रचला.

हे सुद्धा वाचा

आरोपीकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत

यावेळी पोलिसांना पाहून संशयित नायजेरीन व्यक्तीने पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीत 10 लाख 24 हजार किमतीचे 102.400 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग, तर त्याच्या घराची झडती घेतली असता 17 लाख 22 हजार 500 रुपये किमतीचे 171.250 ग्रॅम वजनाचे कोकेन आणि 31 लाख 28 हजार 300 रुपये किमतीचे 223.45 ग्रॅम वजनाचे MDMA, ECSTASY हे अंमलीपदार्थ मिळून आले आहे.

या कारवाईत तुळिंज पोलिसांनी एका नायजेरियन आरोपीसह एकूण 58 लाख 74 हजार रुपये किमतीचे अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात तुळिंज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8 (क), 21 (क), 22 (क) अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीनंतर हा गुन्हा नार्को टेस्ट विभागाकडे वर्ग करण्यात आला.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.