जिल्हा रुग्णालयात तुंबळ हाणामारी! परिचर आणि महिला एकमेकींना भिडल्या, हाणामारीचा VIDEO व्हायरल…

नाशिक जिल्हा रुग्णालयात परिचर आणि रुग्णाची नातेवाईक यांचा हाणामारीचा व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

जिल्हा रुग्णालयात तुंबळ हाणामारी! परिचर आणि महिला एकमेकींना भिडल्या, हाणामारीचा VIDEO व्हायरल...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 6:03 PM

नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील एक धक्कादायक ( Nashik News ) प्रकार समोर आला आहे. रुग्णाची महिला नातेवाईक आणि परिचर यांच्यात तुंबळ ( Nashik Civil Video ) हाणामारी झाल्याची बाब समोर आली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकावर पोलीसांनी कारवाई करावी यासाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचर रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलणे याहून झाला वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयातील हाणामारी समोर आल्यानंतर आरोग्य क्षेत्रात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईक आणि परिचर यांच्यात वाद झाला होता. साफसफाई करत असतांना उद्धटपने बोलल्याने हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

वाद सुरू असतांना एकमेकींनी शिवीगाळ केली आणि त्यानंतर थेट हाणामारीच झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी उपस्थित इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी याबाबतचे व्हिडिओ काढले होते. त्यानंतर ही बाब समोर आली आहे.

त्यानंतर परिचर महिलेला मारहाण झाल्यानंतर कर्मचारी आक्रमक झाले असून पोलीसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. जो पर्यन्त पोलिस कारवाई करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन केले जाईल अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयातील परिचर आणि रुग्णाची नातेवाईक असलेल्या महिलेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नाशिकचे जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले. कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलणे या वरुन हा झाला वाद झाल्याची माहिती समोर येत असली तरी दुसरीकडे यातील तथ्य काय आहे हे चौकशीतच समोर येईल त्यामुळे येत्या काळात या प्रकरणी पोलीस काही कारवाई करतात का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.