पबजीतून झाले प्रेम, प्रेमासाठी ती पाकिस्तान सोडून चार मुलांसह भारतात आली

पबजी खेळत असताना पाकिस्तानी महिला सीमा उत्तर प्रदेशातील सचिनच्या प्रेमात पडली. तिला चार मुलं आहेत. पाकिस्तानातील पतीला सोडून ती मुलांसह नेपाळमध्ये शिरली.

पबजीतून झाले प्रेम, प्रेमासाठी ती पाकिस्तान सोडून चार मुलांसह भारतात आली
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 5:31 AM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे पाकिस्तानमधून आलेल्या महिलेला ताब्यात घेतले. ग्रेटर नोएडातील सचिन नावाच्या व्यक्तीशी प्रेम झाल्यानंतर ही महिला पाकिस्तानवरून आधी नेपाळमध्ये गेली. नेपाळमार्गे भारतात आली. आपल्या सोबत चार मुलंही घेऊन आली. पाकिस्तानातील सीमा गुलाम हैदर नावाची ही महिला ग्रेटर नोएडाच्या सचिन सोबत पबजी खेळत होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नासाठी ती पाकिस्तानवरून भारतात आली. पाकिस्तानवरून महिला ग्रेटर नोएडात आल्याची माहिती पसरली. त्यानंतर ग्रेटर नोएडा पोलिसांनी सीमाला ताब्यात घेतले.

प्रेमासाठी भारतात आली

गुप्तचर विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ही माहिती त्यांना का झाली नाही. पाकिस्तानवरून ही महिला नेपाळमार्गे भारतात आली. पण, गुप्तचर यंत्रणेला हे का माहीत झाले नाही. सीमा ग्रेटर नोएडात आली. तिने सचिनसोबत कोर्टात लग्नही केलं. आता या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिनसोबत मला प्रेम झालंय. त्यामुळे मी भारत सोडून जाणार नसल्याचं सीमाचं म्हणण आहे.

पबजी खेळत असताना पाकिस्तानी महिला सीमा उत्तर प्रदेशातील सचिनच्या प्रेमात पडली. तिला चार मुलं आहेत. पाकिस्तानातील पतीला सोडून ती मुलांसह नेपाळमध्ये शिरली. त्यानंतर सीमाने चार मुलांसह भारतात प्रवेश केला.

जमिनीची विक्री करून तयार केला पासपोर्ट

सचिन हा सीमापेक्षा चार-पाच वर्षांनी लहान आहे. पबजी खेळल्यानंतर ते संवाद साधत होते. सोशल मीडियावरून मोबाईल नंबर शेअर केला. त्यानंतर त्यांनी भेटण्याचे ठरवले. मार्च महिन्यात सीमा आणि सचिन नेपाळमध्ये एका हॉटेलमध्ये सात दिवस राहिले. त्यावेळी त्यांनी सीमा भारतात येईल, असं ठरवलं. सोबत चारही मुलांना आणायचं होतं. त्यासाठी तिने सर्व मुलांचे पासपोर्ट तयार केले. त्यासाठी जमिनीची विक्री केली. त्यानंतर ती विमानानं काठमांडूला पोहचली. तिथून दिल्लीला चारही मुलांसह आली.

मोबाईल फारेन्सिक लॅबला पाठवला

लग्नासाठी सचिनने वकिलांची मदत घेतली. सीमा खरचं कशासाठी आली. याचा शोध आता पोलीस घेत आहेत. कारण पोलिसांना कट कारस्थानाचा संशय येत आहे. त्यामुळे सीमाचा मोबाईल फोन फारेन्सिक तपासासाठी पाठवला आहे. कुणासोबत संपर्क होता, हे यातून माहीत होईल. आंबेडकरनगरात ती किरायाने राहत होती. सचिनच्या कुटुंबीयांनी सीमाला विरोध केला.

सचिन हेल्परचे काम करतो

सचिन हा २३ ते २४ वर्षांचा आहे. सीमा त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. सीमाचे वय सुमारे २७ ते २८ वर्षे आहे. सचिन हा हेल्पर म्हणून काम करतो. त्याचे मासिक उत्पन्न १० ते १२ हजार रुपये आहे. १३ मे रोजी सीमा ग्रेटर नोएडामध्ये पोहचली. वकिलांचा सल्ला घेण्यासाठी सचिनचे वडील गेले. त्यानंतर ही घटना पोलिसांना माहीत झाली. पोलिसांनी ट्रॅप करून त्यांना ताब्यात घेतले. तेव्हा सर्व धक्कादायक खुलासे झाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.