Jalgaon Man Death : थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवली होती, शेक घेताना तोल गेला अन्…

शेकोटीजवळ शेक घेण्यासाठी गेलेल्या इसमाचा तोल गेल्याने तो शेकोटीत पडला. यात गंभीर भाजल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे.

Jalgaon Man Death : थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवली होती, शेक घेताना तोल गेला अन्...
शेकोटीत पडून व्यक्तीचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 7:55 PM

जळगाव : सध्या थंडीने देशभरात कहर माजवला आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक शेकोटीचा आधार घेतात. मात्र हीच शेकोटी एका इसमाच्या जीवावर बेतली आहे. शेकोटीजवळ शेक घेण्यासाठी गेलेल्या इसमाचा तोल गेल्याने तो शेकोटीत पडला. यात गंभीर भाजल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे. ईश्वर अहिरे असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

एमआयडीसी परिसरात बंद कंपनीजवळ घडली घटना

जळगावमध्ये एमआयडीसी परिसरात एका बंद पडलेल्या कंपनी बाहेर थंडीमुळे पेटवलेल्या शेकोटीत तोल जाऊन भाजल्यामुळे एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ईश्वर अहिरे असे मृत इसमाचे नाव आहे.

शेकोटीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू

मयत ईश्वर अहिरे हा मद्यपान करत असून, थंडीमुळे सदर इसमाने शेकोटी पेटवली होती. मात्र त्यात त्याचा तोल जाऊन तो गंभीररित्या भाजला गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे सुद्धा वाचा

दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे दाखल झाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.