Nupur Sharma: नुपूर शर्माचा व्हिडीओ पाहणाऱ्यार भर बाजारात चाकू हल्ला; सहा वेळा सपासप वार केले

अंकितने त्याच्या मित्रासोबत दुकानात बसून मोबाईलमध्ये स्टेटस पाहत होता. त्यात नुपूर शर्माचा एक व्हिडिओ होता. मागून काही लोक आले आणि त्यांनी विचारले नुपूर शर्माचा समर्थक आहेस का? त्याने हो म्हणताच या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने वार करायला सुरुवात केली.

Nupur Sharma: नुपूर शर्माचा व्हिडीओ पाहणाऱ्यार भर बाजारात चाकू हल्ला; सहा वेळा सपासप वार केले
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 4:10 PM

नवी दिल्ली : वादग्रस्त नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने देशात दोघांच्या हत्या झाल्या आहेत. राजस्थान आणि महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये नुपूर शर्मांच्या समर्थकावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नुपूर शर्मांचा व्हिडिओ पाहिल्याने एका तरुणाला चाकूने भोसकण्यात आले आहे. नुपूर शर्माचा व्हिडीओ पाहणाऱ्या तरुणावर भर बाजारात चाकू हल्ला करण्यात आला. या तरुणावर सहा वेळा चाकूने सपासप वार करण्यात आले. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.

अंकित झा असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंकित हा सीतामढी येथील राहणारा आहे. भर बाजारात अंकितवर चाकूने 6 वार करण्यात आले. दरभंगा येथील डीएमसीएच रुण्गालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. असून अंकितवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहेत. अंकितचा चाकू मारल्यानंतरचा व्हिडिओही देखील समोर आला आहे.

अंकितने त्याच्या मित्रासोबत दुकानात बसून मोबाईलमध्ये स्टेटस पाहत होता. त्यात नुपूर शर्माचा एक व्हिडिओ होता. मागून काही लोक आले आणि त्यांनी विचारले नुपूर शर्माचा समर्थक आहेस का? त्याने हो म्हणताच या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने वार करायला सुरुवात केली.

अंकित पान खाण्यासाठी त्याच्या मित्रासह एका पान दुकानात गेला होता. यादरम्यान तो आणइ त्याचा मित्र नुपूर शर्माचा व्हिडिओ मोबाईलमध्ये पाहत होते. त्याचवेळी मोहम्मद बिलाल नावाच्या व्यक्तीसह 3 लोक दुकानात आले आणि त्याच्या मोबाईलवर नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहून संतापले.

या तिघांनी अंकित आणि त्याच्या मित्राला धमकावत प्रथम सिगारेटचा धूर त्यांच्या चेहऱ्यावर उडवला. त्यानंतर शिवीगाळ सुरू केली. या दोघांनी हल्लेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तिघांनी अंकितवर चाकूने वार केले. अंकित झा हा नानपूरच्या बहेरा गावचा रहिवासी आहे.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरात वाद सुरू आहे. उदयपूरमधील कन्हैयालालने नुपूर शर्माच्या बाजूने पोस्ट टाकली होती. यांनतर त्याची हत्या करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रात अमरावतीच्या उमेश कोल्हे(Umesh Kolhe) यांची हत्या करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma)पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहचल्या आहेत. मोहम्मद पैगंबर वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी केलेल्या टिप्पणीनंतर, त्यांचा अधिक धमक्या (new threats)येण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दोन महिन्यांपूर्वी टीव्हीवरील चर्चेच्या कार्यक्रमात त्यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक इस्लामिक राष्ट्रांनीही यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर भाजपाने त्यांना प्रवक्ते पदावरुन निलंबित केले होते. यापूर्वीही नुपूर शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी देशाभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या एफआयआरची सुनावणी एकाच ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. याला सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता आणि त्यांच्याविरोधात काही कठोर वक्तव्ये केली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.