Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिममध्ये पुश अप्स करत होता पोलीस कॉन्स्टेबल, अचानक खाली कोसळला तो पुन्हा उठलाच नाही !

पुशअप्स केल्यानंतर तो उभा राहिला. त्यानंतर खाली पडू लागला, त्यापूर्वी त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. ही बाब लक्षात येताच जिममधील अतर लोक धावत आले. त्यांनी विशालच्या तोंडावर पाणी मारले.

जिममध्ये पुश अप्स करत होता पोलीस कॉन्स्टेबल, अचानक खाली कोसळला तो पुन्हा उठलाच नाही !
जिममध्ये वर्कआऊट करताना पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यूImage Credit source: google
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 6:08 PM

हैदराबाद : जिममध्ये वर्कआऊट करताना 24 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल अचानक कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. वर्कआऊट करताना हृदयाची गती वाढल्याने अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. 24 वर्षीय पोलीस हवालदार यमजला धरम विशाल गुरुवारी संध्याकाळी मरेडपल्ली येथील जिममध्ये बेशुद्ध पडला. त्यानंतर तो उठलाच नाही. ही सर्व घटना जिममधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विशालने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला

सीसीटीव्हीमध्ये विशाल पुश अप्स करताना दिसत आहे. पुशअप्स केल्यानंतर तो उभा राहिला. त्यानंतर खाली पडू लागला, त्यापूर्वी त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. ही बाब लक्षात येताच जिममधील अतर लोक धावत आले. त्यांनी विशालच्या तोंडावर पाणी मारले. मात्र तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. अखेर त्यासा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दोन वर्षापूर्वीच पोलीस दलात रुजू

विशाल हा दोन वर्षांपूर्वी तो पोलीस दलात रुजू झाला होता. शहरातील आसिफ नगर पोलीस ठाण्यात तो कर्तव्यावर होता. त्याच्या सहकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, तो त्याच्या आरोग्याबाबत आणि फिटनेसबाबत जागरूक होता. त्याला आरोग्याची कोणतीही समस्या नव्हती. बोवेनपल्ली येथील रहिवासी असलेला विशाल हा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी जिममध्ये गेला होता.

हे सुद्धा वाचा

जिममध्ये वर्कआऊट करताना हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. याआधीही अनेकांचा जिममध्ये वर्कआऊट करताना मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.