प्रेयसीच्या मैत्रिणीच्या भावांकडून मारहाण, ऑटो चालकाने ‘असा’ घेतला बदला

भावांनी केल्याच्या रागातून रिक्षा चालकाने प्रेयसीच्या मैत्रिणीचे फेक सोशल मीडिया अकाऊंट बनवून आक्षेपार्ह फोटो अपलोड केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

प्रेयसीच्या मैत्रिणीच्या भावांकडून मारहाण, ऑटो चालकाने 'असा' घेतला बदला
प्रेमसंबंध मान्य नसल्याने बापाने मुलीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 7:40 PM

नवी दिल्ली : प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर प्रेयसीच्या मैत्रिणीच्या भावांनी मारहाण केल्याच्या रागातून एका रिक्षा चालकाने तरुणीचा बदला घेतला. रिक्षाचालकाने प्रेयसीच्या मैत्रिणीचे फेक इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून तिचे फोटो पोस्ट केले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. रोशन शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शर्माला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी येथून अटक करण्यात आली. ही बाब उघड झाल्यानंतर तरुणीला धक्काच बसला. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.

आरोपीचे प्रेयसीसोबत भांडण झाले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन शर्मा याचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झाले होते. यामुळे प्रेयसीची मैत्रिण असलेल्या पीडित तरुणीने दोघांमध्ये हस्तक्षेप केला. पीडितेने आपल्या भावांना ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीला मारहाण केली. यामुळे आरोपी चांगलाच संतापला. या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याने पीडित तरुणीला अद्दल घडवण्याचे ठरवले. यातून त्याने हे कृत्य केले.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला पकडले

पीडितेने गेल्या महिन्यात पोलिसांकडे कुणीतरी तिचे फेक अकाऊंट केल्याबाबत तक्रार दिली होती. या फेक अकाऊंटवरुन कुणीतरी तिच्या फोटोंशी छेडछाड करत अपलोड केले. तसेच तरुणीचा मोबाईल नंबरही टाकल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले होते. यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरु केला.

हे सुद्धा वाचा

आयपी अॅड्रेसवरुन आरोपीला अटक

तपासादरम्यान पोलिसांना इन्स्टाग्रामवर तीन अकाऊंट आढळले. या अकाऊंटवरुन पीडितेचे अश्लील आणि विनयभंगाचे फोटो अपलोड करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी सदर अकाऊंट ज्या आयपीवरुन ऑपरेट करण्यात येत होते त्याची माहिती काढली. या आयपी अॅड्रेसच्या आधारे पोलिसांनी आरोपीला गाझियाबादमधील लोनी येथून अटक केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.