मोहाची फुले गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता चिमुरडा, वाटेत विचित्र वस्तू दिसली म्हणून उचलली; मग…

| Updated on: Feb 20, 2023 | 4:46 PM

फुले गोळा करुन दोघेही घरी परतत होते. यावेळी वाटत मुलाला काहीतरी विचित्र वस्तू दिसली. ही वस्तू काय हे पाहण्यासाठी मुलाने कुतूहलाने हातात उचलली.

मोहाची फुले गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता चिमुरडा, वाटेत विचित्र वस्तू दिसली म्हणून उचलली; मग...
crimescene
Image Credit source: socialmedia
Follow us on

कोरबा : जंगलात मोहाची फुले गोळा करण्यासाठी गेलेल्या सात वर्षाच्या मुलाचा बॉम्बच्या स्फोटात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील कोरबा जंगलात घडली. कोरबा जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर असलेल्या अजगरबहार ग्रामपंचायतीच्या डोंगाभाटा गावच्या जंगलात रविवारी ही घटना घडली. मृत बालक मित्रासह जंगलात मोहाची फुले वेचण्यासाठी गेला होता. तेथे त्याला जमिनीवर काहीतरी विचित्र वस्तू पडली असल्याचे दिसले. त्याने कुतूहलापोटी ही वस्तू हातात उचलताच बॉम्बचा स्फोट झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

जंगलात मोहाची फुले गोळा करण्यास गेला होता

डोंगाभाटा गावच्या जंगलात गावातील मुलगा त्याच्या मित्रासोबत मोहाची फुले गोळा करण्यासाठी गेला होता. फुले गोळा करुन दोघेही घरी परतत होते. यावेळी वाटत मुलाला काहीतरी विचित्र वस्तू दिसली. ही वस्तू काय हे पाहण्यासाठी मुलाने कुतूहलाने हातात उचलली. वस्तू हातात घेताच तिचा स्फोट झाला. यात मुलाचा चेहरा आणि डोक्याच्या चिंधड्या उडाल्या.

स्फोटात गंभीर जखमी झाल्याने मुलाचा मृत्यू

स्फोटात गंभीर जखमी झाल्याने कोरवा समाजातील मुलाचा मृ्त्यू झाला. रानडुक्कराची शिकार करण्यासाठी शिकाऱ्यांनी जंगलात बॉम्ब ठेवला होता. फुले गोळा करण्यासाठी गेलेल्या मुलाला काहीतरी विचित्र वस्तू दिसली म्हणून त्याने तो बॉम्ब उचलताच त्याचा स्फोट झाला. यात चेहरा आणि डोके फुटल्याने त्याचा वेदनादायक मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

रानडुक्कराच्या शिकारीसाठी जंगलात ठेवला होता बॉम्ब

रानडुकराची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांमुळे ही घटना घडली आहे. जंगलात झालेल्या स्फोटाच्या आवाजाने गावातील लोकांना वाटले गाणे वाजत असेल. मात्र काही वेळातच मुलाच्या मृत्यूची बातमी आली. पोलीस आणि आरोग्य विभागाला बालकाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. अनेकदा शिकारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी येथे येतात आणि जंगलात बॉम्ब टाकतात.

पहाडी कोरवा ही एक संरक्षित जमात आहे. राष्ट्रपतींनी त्यांना दत्तक घेतले आहे. त्यांची लोकसंख्या खूपच कमी असून, आजही ते जंगलात राहतात.