New York Firing Brooklyn : न्यूयॉर्कमधील मेट्रो स्टेशनवर गोळीबार, पाच ठार तर अनेक जण जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर स्थानकात धुराचे लोट पसरले होते. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. गोळी झाडणारा व्यक्ती बांधकाम कामगाराच्या कपड्यात मेट्रो स्टेशनवर आला होता. तसेच त्याने गॅस मास्क देखील घातला होता, असे प्राथमिक तपासानंतर बोलले जात आहे.
न्यूयॉर्क : आताची सर्वात मोठी बातमी ही अमेरिकेतून आहे. महत्वाचं शहर असलेल्या न्यूयॉर्कमध्ये अंधाधूंद गोळीबार (Firing) करण्यात आलाय. ह्या घटनेत पाच जण मृत्यूमुखी (Death) पडल्याची प्राथमिक माहिती आहे. AP ह्या जागतिक वृत्तसंस्थेनं तसं वृत्त दिलेलं आहे. न्यूयॉर्कमधल्या ब्रुकलेन स्टेशनमध्ये गोळीबार केला गेलाय. स्टेशनवर रक्ताच्या थारोळ्यात अनेक जण असल्याचं एपीच्या वृत्तात म्हटलं आहे. घटनास्थळी अनेक लोकांना गोळ्या घातल्या गेल्याचे न्यूयॉर्क शहर अग्निशमन विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. या गोळीबारात 13 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. जखणींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांकडून घटनास्थळी सुरक्षा वाढवण्यात आली असून संपूर्ण न्यूयॉर्क शहरात भुयारी मार्ग सेवाही बंद करण्यात आली आहे. (A shooting at a New York subway station has left several people injured)
घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर स्थानकात धुराचे लोट पसरले होते. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. गोळी झाडणारा व्यक्ती बांधकाम कामगाराच्या कपड्यात मेट्रो स्टेशनवर आला होता. तसेच त्याने गॅस मास्क देखील घातला होता, असे प्राथमिक तपासानंतर बोलले जात आहे. सध्या घटनास्थळी उपस्थित असलेले सर्व सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जात असून आरोपीचा शोध सुरू आहे. ही घटना दहशतवादी संघटनेकडून घडवून आणण्यात आली आहे की अन्य काही कट आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (A shooting at a New York subway station has left several people injured)
Five people were shot at a subway station in Brooklyn, New York, law enforcement sources said. According to multiple law enforcement sources, preliminary information indicated a suspect was wearing a construction vest and a gas mask. https://t.co/RDISyMBTKQ
— The Associated Press (@AP) April 12, 2022
इतर बातम्या