30 रुपयांच्या उधारीबद्दल विचारल्यानं मारलं, जखमी दुकानदाराला रुग्णालयात न्यावं लागलं! कुठं घडला प्रकार?
30 रुपयांची उधारी कधी देणार, अशी विचारणा दुकानदारांनं युवकाला केली. किराणा दुकानातून नेलेल्या मालाच्या रक्कमेतील राहिलेला 30 रुपये दुकानदारानं या युवकाकडे मागितले होते.
लातूर : भांडण, मारामारी यासाठी कारण फार मोठं लागतं, अशातला भाग नाही. काही जणांना कोणतंही कारण भांडण करण्यासाठी पुरेसं असतं. क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होतात. मग ते वाद टोकाला जातात. त्यातून नको त्या अनन्यसाधारण गोष्टी घडतात. अनेकदा असं झाल्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. काही वेळा तर क्षुल्लक शब्दालाही लाजवतील, अशा कारणावरुन भांडणं होत असल्याचं दिसून आलंय. आता असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण क्षुल्लक आहे. पण वाद इतका झाला की चक्क प्रकरण रुग्णालयापर्यंत जाऊन पोहोचलं. घटना आहे लातूर जिल्ह्यातल्या (Latur District) वायगाव इथली! वायगावात दुकानदाराचा आणि उधारी घेतलेल्या एकाचं भांडण झालं. भांडणाचं कारण होतं उधारी. उधारीतून सुरु झालेला वाद टोकाला गेला. दुकानाच्या मालकाला मारहाण झाली. जखमी दुकानदाराला अखेर रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावं लागलं. उधारीची रक्कम इतकी होती, की आता बहुधा रुग्णालयाचं बिल हे उधारीच्या रक्कमेच्या दसपट होण्याचीच शक्यता जास्त आहे.
30 रुपयांवरुन राडा!
लातुरातल्या वायगाव इथं विकास बिरादार यांचं किराणा मालाचं दुकान आहे. या दुकानातू एक जण काही सामान घेऊन घरी गेला. पैसे नंतर देतो असं सांगून हा इसम सामान घेऊन गेला. त्यानंतर जेव्हा पुन्हा या इसमाला विकास यांनी 30 रुपयांबद्दल विचारणा केली, तेव्हा वाद झाला. उधारी देण्याघेण्यावरुन युवकानं दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार घडला.
उधारी विचारणं दुकानदारालाच महागात
30 रुपयांची उधारी कधी देणार, अशी विचारणा दुकानदारांनं युवकाला केली. किराणा दुकानातून नेलेल्या मालाच्या रक्कमेतील राहिलेला 30 रुपये दुकानदारानं या युवकाकडे मागितले होते. उधारीबद्दल विचारणा केल्याच्या रागातून युवकानं दुकानदारालाच मारहाण केली.
मारहाणीमध्ये दुकानदाराला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. उदगीरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एकूणच क्षुल्लक उधारीच्या रक्कमेतून झालेला वाद आता दुकानदारालाच महागात पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
‘सुर्वे, ठोबरेंच्या नादी लागतो काय’ असं म्हणत मुळशी तालुक्यात उपसंरपंचावर हल्ला, गाडीचीही तोडफोड
Crime | पत्नीवर वाकडी नजर टाकायचा, रागाच्या भरात मित्राचा काढला काटा, भल्या पहाटे खळबळ