Ulhasnagar Slab Collapse : उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, दुरुस्ती सुरू असताना घडली दुर्घटना

या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह महापालिका अधिकारी, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर या इमारतीत राहणाऱ्या 20 कुटुंबांना महापालिकेनं बाहेर काढत ही इमारत सील केली.

Ulhasnagar Slab Collapse : उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, दुरुस्ती सुरू असताना घडली दुर्घटना
उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 5:55 PM

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब (Slab) कोसळण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू (Death) झाला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील गोल मैदान परिसरात कोमल पार्क नावाची इमारत आहे. ही इमारत महापालिकेनं 2021 साली धोकादायक (Dangerous) घोषित केली होती. धोकादायक इमारतींच्या सी 2 बी वर्गवारीत या इमारतीचा समावेश करत दुरुस्ती करून वापर करण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्या होत्या. मात्र आज दुपारी पाचव्या मजल्यावरील घरात दुरुस्तीचं काम सुरू असताना सहाव्या मजल्याचा स्लॅब दुरुस्ती करणाऱ्या मजुरांच्या अंगावर येऊन पडला. या दुर्घटनेत खलीलूर रेहमान या 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. तर गणेश सणस हा 28 वर्षीय कामगार जखमी झाला. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महापालिकेकडून इमारत सील

या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह महापालिका अधिकारी, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर या इमारतीत राहणाऱ्या 20 कुटुंबांना महापालिकेनं बाहेर काढत ही इमारत सील केली. या रहिवाशांना राहण्यासाठी जागा नसल्यास त्यांची ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाईल, असं यावेळी अजीज शेख यांनी सांगितलं.

उल्हासनगरात धोकादायक इमारतींचा प्रश्न प्रलंबित

उल्हासनगर शहरात अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाचं विशेष धोरण राबवण्याची आवश्यकता असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी उल्हासनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी केली आहे. उल्हासनगर शहरात आजवर स्लॅब कोसळून अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. त्यामुळं शासनानं तातडीनं उल्हासनगरसाठी क्लस्टर योजना किंवा अन्य काहीतरी उपयोजना करण्याची आवश्यकता आहे. (A slab of a building collapsed during repair work in Ulhasnagar and one person died)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.