Crime |दुर्दैवी घटना : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले , पती-पत्नीचा जागेवर मृत्यू
मालवाहतूक ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पुढे चाललेल्या दुचाकीस्वारांना ट्रकने चिरडले. अपघाताची घटना घडल्यानंतर दुचाकीस्वरांना मदत करण्याचे सोडून , माराच्या भीतीने चालक व वाहक दोघेही तेथून पळून गेले.
बारामती – बारामतीतील पाट्स रस्त्यावर भरधाव ट्रॅकने दुचाकी स्वारांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या अपघातात पती-पत्नी असलेले दुचाकी स्वार जागेवरच ठार झाले आहेत. आज आज सकाळी सव्वा अकाराच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत देऊळगाव रसाळ येथील रहिवाशी असलेले काळूराम गणपत लोंढे(६०) आणि शाकूबाई काळूराम लोंढे(५५)यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान मालवाहतूक करणार ट्रक (क्रमांक एम. एच. १८ बी.जी. ०८१४ ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावरून दुचाकी क्रमांक ( एम. एच ४२ बी. सी. ८२३४ ) बारामतीच्या दिशेने निघाली होती. यावेळी मालवाहतूक ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पुढे चाललेल्या दुचाकीस्वारांना ट्रकने चिरडले. अपघाताची घटना घडल्यानंतर दुचाकीस्वरांना मदत करण्याचे सोडून , माराच्या भीतीने चालक व वाहक दोघेही तेथून पळून गेले.
नागरिकांनी दाखवले प्रसंगावधान पण … मात्र प्रसंगावधान राखत स्थानिक नागरिकांनी घटना स्थळावर धाव घेतली. स्थानिकानी तसेच पोलीस मित्रांनी ट्रक खाली अडकलेल्या पती -पत्नीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक मालाने भरलेला असल्याने त्यांना जखमींना बाहेर काढण्यात अपयश आले. यातच दोन्ही जखमींची जाग्यावर मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चालक व वाहक यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या:
मुस्लिम आरक्षणासाठी समाजानं रस्त्यावर उतरावं का? औरंगाबादमध्ये ओवेसींचे सरकारला 5 सवाल
दरेकर म्हणतात, दाऊद नाव केवळ मुस्लिमांचच का? मराठ्यांमध्येही आहेत, वानखेडेवर वाद वाढणार?