पोटातून निघाला चक्क स्टीलचा ग्लास, पण हा ग्लास पोटात गेला कसा?
बिहारमधील बेतिया येथील एका 22 वर्षीय तरुणाच्या काही दिवसांपूर्वी अचानक खूप पोटात दुखू लागले. इतकेच नाही तर त्याला ब्लिडिंगही होऊ लागले. तरुणाची गंभीर परिस्थिती पाहून त्याला तात्काळ पटना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बिहार : पोटदुखी एक सामान्य बाब आहे. आजकालच्या फास्ट फूडचे अधिक सेवन, बिझी जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटदुखीच्या समस्या (Stomach problems) वारंवार जाणवतात. अशीच पोटदुखीची समस्या बिहारमधील (Bihar) एका तरुणाला जाणवली. वारंवार पोटात दुखत असल्यामुळे तरुण डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याच्या पोटाचे काही रिपोर्ट्स केले, या रिपोर्ट्समध्ये जे आले ते पाहून डॉक्टर चक्रावले. रिपोर्टमध्ये तरुणाच्या पोटात चक्क स्टीलचा ग्लास (Steel Glass) आढळून आला.
बिहारमधील बेतिया येथील एका 22 वर्षीय तरुणाच्या काही दिवसांपूर्वी अचानक खूप पोटात दुखू लागले. इतकेच नाही तर त्याला ब्लिडिंगही होऊ लागले. तरुणाची गंभीर परिस्थिती पाहून त्याला तात्काळ पटना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अहवालात पोटात आढळला स्टीलचा ग्लास
डॉक्टरांनी त्याचे पोटाचे रिपोर्ट्स काढले तेव्हा रिपोर्ट्समध्ये पोटात चक्क 14 सेमीचा (5.5 इंच) ग्लास पोटात अडकल्याचे आढळले आणि डॉक्टरही चक्रावून गेले. हा पोटात अडकल्याने तरुणाला ब्लिडिंग होऊ लागले होते.
पटना मेडीकल कॉलेज रुग्णालयात तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया
यानंतर पटना मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या 11 डॉक्टरांच्या टीमने अडीच तास यशस्वी शस्त्रक्रिया करुन तरुणाच्या पोटातील स्टीलचा ग्लास बाहेर काढला. तरुणाच्या पोटातून ग्लास बाहेर काढण्यासाठी कोलोस्टॉमी करण्यात आली.
कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया काय आहे?
या शस्त्रक्रियेत आतड्यात एक होल केला जातो आणि जखम बरी होण्यासाठी यात एक बॅग फिट केली जाते. तरुणाला काही दिवस रुग्णालयातून ठेवून मग त्याला घरी सोडण्यात येईल. यानंतर जानेवारीमध्ये त्याची कोलोस्टॉमी काढली जाईल.
तरुण दारुच्या नशेत असताना हा ग्लास त्याच्या पोटात गेल्याने त्याला याबाबत काही आठवत नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. सध्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.