Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Crime : गॅलरीत उभी असताना अचानक तोल गेला, तिसऱ्या मजल्यावरुन पडून नववीची विद्यार्थिनी जखमी

सकाळी 11.30 वाजता वर्गातील शेवटचा तास होता. त्याआधी शिक्षक येईपर्यंत वर्गातील सर्व विद्यार्थी गॅलरीत उभे होते. यावेळी जखमी विद्यार्थिनीही गॅलरीत उभी होती. यावेळी अचानक तोल गेल्याने तिसऱ्या मजल्यावरुन विद्यार्थिनी खाली कोसळली.

Jalgaon Crime :  गॅलरीत उभी असताना अचानक तोल गेला, तिसऱ्या मजल्यावरुन पडून नववीची विद्यार्थिनी जखमी
संपत्तीच्या हव्यासातून भावाने भावाला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 6:24 PM

जळगाव : गॅलरीत उभी असताना अचानक तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरुन नववीची विद्यार्थिनी खाली कोसळल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात घडली आहे. जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज सकाळी 11.30 च्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात कंबरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत मुलीला नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी तिला जळगाव येथे हलवण्यात आले.

जामनेरमधील न्यू इंग्लिश स्कूलमधील घटना

जामनेरमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववी वर्गात जखमी विद्यार्थिनी शिकत होती. सकाळी 11.30 वाजता वर्गातील शेवटचा तास होता. त्याआधी शिक्षक येईपर्यंत वर्गातील सर्व विद्यार्थी गॅलरीत उभे होते.

शिक्षक येईपर्यंत सर्व विद्यार्थी गॅलरीत उभे होते

यावेळी जखमी विद्यार्थिनीही गॅलरीत उभी होती. यावेळी अचानक तोल गेल्याने तिसऱ्या मजल्यावरुन विद्यार्थिनी खाली कोसळली. घटना घडताच शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हे सुद्धा वाचा

मुलीला जळगाव येथे उपचारासाठी हलवले

यानंतर मुलीला तिच्या पालकांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मुलीच्या कंबरेला आणि पायाला गंभीर दुखापत

या अपघातात मुलीच्या कंबरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र मुलीचा नेमका तोल कशामुळे गेला याबाबत अद्याप कळू शकले नाही.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.