शिक्षकी पेशाला काळिमा, ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकाकडूनच हैवानी कृत्य
सोलापुरात जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. घटना उघडकीस येताच सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शिक्षखी पेशालाचा काळिमा फासला गेला आहे.
सागर सुरवसे, सोलापूर : सोलापुरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. आरोपी शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यानुसार मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत. ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकाकडूनच असे कृत्य घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
पालकांच्या फिर्यादीवरुन शिक्षकावर गुन्हा दाखल
आरोपी शिक्षक गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थिनीवर अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. अखेर शिक्षकाच्या या जाचाला कंटाळून मुलीने आईला सर्व प्रकार सांगितला. यानंतर मुलीच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पोलीस आरोपीविरोधात पुढील कारवाई करत आहेत.
नागपुरात चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुकलीवर अत्याचार
चॉकलेटचे आमिष दाखवत चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. कोराडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी वीटभट्टी कामगार आहे. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी कोराडी पोलीस अधिक तपास करत आहेत.